तरुण भारत

प्रकाश पाटील यांचा प्रचाराचा झंझावत आणि वाढता पाठिंबा

प्रतिनिधी/ सातारा

गेली 26 वर्षे शिक्षण क्षेत्रात विविध प्रश्नांसाठी झटणाऱया प्रकाश पाटील यांचा सोलापूर,सांगली,कोल्हापूर,सातारा,पुणे जिल्हयात अफाट जनसंपर्क आहे.यामुळे शिक्षक मतदार संघातून ते भरघोस मतांनी विजयी होण्यासाठी पुरक ठरणार आहे.अनेक शिक्षक, शिक्षण संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी आजपर्यंत केलेली मदत यामुळेचं त्यांच्या उमेदवारला मोठया प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे दिसते.पुणे विभाग शिक्षक मतदार संघात प्रकाश पाटील हे सर्व परिचित असे एकमेव उमेदवार म्हणून असून इतरांपेक्षा त्यांनी प्रचारात ही मोठी आघाडी घेतली आहे.यातून प्रकाश पाटील यांना “पसंती-1 ” चे मत देऊन त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार शिक्षक मतदारांनी केल्याचे दिसते.

      शाळा,महाविद्यालये,तंत्रनिकेतन,निवासी संकुल, मॅनेजमेंट इन्स्टिटयूट, अनेक शिक्षणेत्तर संस्था यांच्याशी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रकाश पाटील यांचा गेली कित्येक वर्षे कोणत्याना कोणत्या कामांनिमित्त संपर्क येत होता.यातून त्यांच्या नेतृत्व कौश्यल्याची ओळख झाल्याने त्यांनी शिक्षक मतदारांचे प्रतिनिधीत्व करावे,असा आग्रह वाढला. अनेकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यांना महाविद्यालयीन शिक्षणापासून नेतृत्वाची संधी मिळत गेली. आजपर्यंत कोणत्याही प्रश्नांला सकारात्मक पर्याय मिळवून देण्यात ते चांगलेच माहिर असल्याचे सर्वज्ञात आहे.यामुळे सध्याच्या प्रचारा दरम्यान त्यांना संस्थापक आणि शिक्षकांकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसते.

     सिंहगड इस्टिटूटचे संचालक असणाऱया प्रकाश पाटींल यांनी पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदावर 2005 ते 2015 या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामामुळे त्यांचा विजयी होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.सध्या शिक्षण संस्थेबरोबर शिक्षकांच्या अनेक प्रश्नांसाठी लढवया नेतृत्वाची गरज आहे. आत्तापर्यंत ज्यांनी नेतृत्व केले,त्यांनी शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी काहीच केले नसल्याचा राग मतदारांच्या मध्ये दिसतो.सामान्य कुटूंबातील असल्याने प्रकाश पाटील हे सर्वांना “आपला माणूस” वाटतात.त्यांच्या सारखे सक्षम नेतृत्व मिळणार असल्याने त्यांना आमचा बिनशर्त पाठिंबा असल्याचे विविध संघटनेच्या शिक्षकांनी तरूण भारत शी बोलताना सांगितले.

   शिक्षक मतदार संघाला यापुर्वी सक्षम नेतृत्व मिळाले नसल्याने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न प्रलंबित आहेत.पुणे विभागाला आता सक्षम नेतृत्व प्रकाश पाटील यांच्या रूपाने मिळणार असल्याने सर्व शिक्षण संस्थांमधून त्यांना चांगलाच पाठिंबा मिळत असल्याने निकालाचे चित्र स्पष्ट होवू लागल्याचे दिसते.त्यांच्या विरोधी उमेवारांकडे प्रचारासाठी मुद्दे नाहीत तर काहीं जणांनी प्रकाश पाटींल यांच्या प्रचाराचा झंझावत आणि त्यांना सोलापूर,सांगली,कोल्हापूर,सातारा,पुणे जिल्हयातून मिळणारा पाठिंबा पाहून आत्ताच माघार घेतल्याचे लक्षात येवू लागले आहे.

Related Stories

सातारा : तक्रारदार नगरसेवकांचाच राजवाडा बसस्थानक परिसरात अपघात

triratna

महाराष्ट्रात 10 हजार पेक्षाअधिक रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन

triratna

अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील : जिल्हाधिकारी शेखर सिंह

triratna

आरास साहित्याची 70 टक्के आयात ठप्प

Shankar_P

मलकापूर बापरपेठ प्रवेशद्वारासमोरील वाहनांची गर्दी हटली; तरुण भारताच्या वृत्ताची घेतली दखल

triratna
error: Content is protected !!