तरुण भारत

चिपळुणात बारा सदनिकांना चोरून वीजपुरवठा!

रहिवाशांच्या तक्रारीनंतर महावितरणकडून पंचनामा, वीजचोरीची चौकशी सुरू

चिपळूण

शहरातील उक्ताड येथे मरियम अपार्टमेंट या इमारतामधील तब्बल बारा सदनिकांना चोरून वीजपुरवठा सुरू असल्याचे शनिवारी महावितरणच्या अधिकाऱयांनी उघडकीस आणले. याबाबत रहिवाशांनीच केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आता यासंदर्भात महावितरणकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 मिरजोळी परिसरात असलेल्या मात्र प्रत्यक्षात चिपळूण नगर परिषद हद्दीत येणाऱया उक्ताड येथे मरियम अपार्टमेंट नावाने नवीन इमारत विकसित करण्यात आली आहे. मात्र या इमारतीला महावितरणकडून अधिकृत वीज पुरवठा देण्यात आलेला नाही. त्यामुळे बाजूच्याच बिल्डिंगमधून थेट सर्व्हीस वायर टाकून मरियम इमारतीत वीज आणून त्यातील बारा सदनिकांमध्ये वीज पुरवठा देऊन अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू होता. याबाबत तेथील रहिवाशी बिल्कीस नईम हळदे यांनी चिपळूण महावितरण कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांनी वीज चोरी सुरू असून विजेच्या वायर उघडपणे पार्किंगमध्ये सोडलेल्या असल्याने लहान मुले व नागरिकांना धोका निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

  या तक्रारीनुसार महावितरणचे येथील कनिष्ठ अभियंता आर. ए. मदने यांनी शनिवारी दुपारी उक्ताड येथील मरियम अपार्टमेंटला भेट देऊन पाहणी केली असता तेथील एका वीज मीटरसाठी वीजखांबावरून आलेला वीजप्रवाह सर्व्हीस वायर टाकून थेट मरियम अपार्टमेंटमध्ये घेऊन अपार्टमेंटमधील सदनिकांत सुरू असल्याचे निदर्शनास आले. या चौदा सदनिकांपैकी बारा सदनिकांना अनधिकृत वीजपुरवठा जोडला गेला असला तरी त्यातील दोन सदनिका या बंद अवस्थेत आहेत.  दरम्यान, याप्रकरणी चौकशी करत महावितरणच्या अधिकाऱयांनी तत्काळ वीज चोरीचा पंचनामा केला. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱयांचे मार्गदर्शन घेऊन नंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले. मात्र या वीज चोरीप्रकरणी संबंधितांवर लाखो रूपयांचा दंड होण्याची शक्यता आहे.

Related Stories

लॉकडाऊन 8 जुलैपर्यंतच, मुदतवाढ नाही – जिल्हाधिकारी

NIKHIL_N

कुडाळ पंचायत समितीमध्ये सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण

NIKHIL_N

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाला लुबाडले

NIKHIL_N

पाटण, कराडला सापडल्या चिपळुणात चोरलेल्या दुचाकी

Patil_p

घोटगेवाडी पोलीस पाटील वाहून गेले

NIKHIL_N

कोकण रेल्वे मार्गावर धावणार पार्सल ट्रेन; आंबा उत्पादकांना दिलासा

prashant_c
error: Content is protected !!