तरुण भारत

रत्नागिरी : पर्यटकांच्या उद्धटपणामुळे पर्यटनक्षेत्रात नाराजी

वार्ताहर / मौजेदापोली

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दापोलीत पर्यटकांची गर्दी वाढत आहेत. गाड्या कुठे उभ्या करायच्या असा प्रश्न देखील असला तरी चांगल्यापणाने विचारणा केल्यानंतरही काहीजण उद्धटपणाने पर्यटक बोलत असल्याचे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी चौकशी दरम्यान ‘तरूण भारत’ला सांगितले.

मुरूड, कर्दे, पाळंदे, हर्णै, लाडघर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अनेक पर्यटक बेफिकीरपणे कोणताही विचार न करता गाड्या चालवत आहेत. तसेच ग्रामीण भागात गेल्यानंतर रस्त्याच्या मध्येच गाड्या उभ्या करून पर्यटक इतरत्र जात असल्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. गाडी नो पार्कींगच्या ठिकाणी उभी केल्यानंतर त्यांना काही सांगण्यास गेल्यानंतर ते उद्धटपने बोलत असल्याचे प्रकार दापोलीत काही दिवसात ऐकण्यास मिळत आहेत.

Related Stories

चिपळुणात एनडीआरएफ जवानांची प्रात्यक्षिके

Patil_p

पहिल्या पावसातच निवेंडीत पूल खचला

Patil_p

बिबटय़ाच्या हल्ल्यात महिलेसह वनअधिकारी जखमी

Patil_p

दुर्गेवाडीत 50 हजाराचा लाकूड साठा जप्त

Patil_p

रत्नागिरीत मुसळधार पाऊस

Patil_p

दोन फुटांच्या मर्यादेमुळे गणेशभक्तांमध्ये संभ्रम

Patil_p
error: Content is protected !!