तरुण भारत

जगभरात 4 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात 5 कोटी 85 लाख 76 हजार 911 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 4 कोटी 05 लाख 39 हजार 628 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

शनिवारी जगभरात 5 लाख 80 हजार 996 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 8922 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जगभरात 1 कोटी 66 लाख 48 हजार 881 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1 लाख 02 हजार 376 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. कोरोनाने आतापर्यंत जगात 13 लाख 87 हजार 902 जणांचा बळी घेतला आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिकेचा प्रथम क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 24 लाख 50 हजार 666 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 74 लाख 03 हजार 847 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 लाख 61 हजार 790 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात आतापर्यंत 90 लाख 95 हजार 908 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 85 लाख 21 हजार 617 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1 लाख 33 हजार 263 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

ब्रिटनमध्ये नवे नियम

Patil_p

आयएमएफचा इशारा

Patil_p

अमेरिकेत एच-1बी व्हिसाचे बदलले नियम, भारतीयांना फटका

omkar B

पाकिस्तानात ननकाना साहीब गुरुद्वारावर हल्ला

triratna

पाक : पुन्हा टाळेबंदी?

Patil_p

कोरोना संकट दीर्घकाळ राहणार

Patil_p
error: Content is protected !!