तरुण भारत

अमेरिकेत मोनोक्लॉनल अँटीबॉडी थेरपीला मान्यता

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कोरोना उपचारांसाठी दिल्या गेलेल्या मोनोक्लॉनल अँटीबॉडी थेरपीच्या आपत्कालीन काळातील सार्वजनिक वापराला अमेरिकन प्रशासनाने परवानगी दिली आहे. 

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनचे आयुक्त स्टीफन हान म्हणाले, मोनोक्लॉनल अँटीबॉडी थेरपीच्या सार्वजनिक वापराला परवानगी देण्यात आल्याने कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल न करताच उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होईल. 

मोनोक्लॉनल थेरपीमध्ये दोन अँटीबॉडीज REGN10933 आणि REGN10987 चा वापर करण्यात येतो. या अँटीबॉडीज व्हायरसच्या कार्यक्षमेतवर परिणाम करतात. त्यामुळे व्हायरसची रुग्णाच्या शरीरात पसरण्याची क्षमता कमी होते आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते.

Related Stories

बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला

prashant_c

जगभरात 23 लाख 31 हजार कोरोनाबाधित

prashant_c

जगभरात 2.10 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

एच-1बी संबंधी अमेरिकेत नवे विधेयक

Patil_p

अमेरिकेत मृत्यूतांडव; 24 तासात 2600 बळी

prashant_c

कित्येक तास काम केल्यावर रडतच घरी परततो!

Patil_p
error: Content is protected !!