तरुण भारत

नियंत्रण रेषेवर आढळली ड्रोनसदृश्य वस्तू

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या पूछ जिल्ह्यातील मेंधर येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ड्रोनसदृश्य वस्तू हवेत उडताना आढळली. हेरगिरीच्या उद्देशाने ही वस्तू सीमारेषेवर पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, राष्ट्रीय तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. 

मेंधर येथे भारतीय भूभागावरील आकाशात ही ड्रोनसदृश्य वस्तू  घिरट्या घालत असल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. तात्काळ याची माहिती तपास यंत्रणांना देण्यात आली. पाकिस्तानकडून दिवसेंदिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि घुसखोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे भारतीय सुरक्षा दल सतर्क झाले आहे. 

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी रोजौरीतील नौशेरामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. या गोळीबारात एक जवान शहीद झाला.

Related Stories

चार दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये कंठस्नान

Patil_p

मध्यप्रदेशात ‘गो कॅबिनेट’साठी झाली पहिली बैठक

datta jadhav

दक्षिण चीन समुद्रात भारतीय युद्धनौका तैनात

Patil_p

मेरठमध्ये आढळले एकाच IMEI क्रमांकाचे तब्बल 13 हजार 500 मोबाईल

datta jadhav

मुंबई : वरळीतील जुन्या पासपोर्ट कार्यालयाच्या इमारतीत स्फोट

pradnya p

घुसखोरीच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Patil_p
error: Content is protected !!