तरुण भारत

अत्याधुनिक असणार कोरोना लसीकरण मोहीम

लस घेणाऱयाचे आधार लिंक होणार : सर्वांना कोविन ऍप डाउनलोड करावे लागणार : तयारी सुरू

जगात एकूण 73 लसी विविध टप्प्यांमध्ये असून यातील 6 लसींचा आपत्कालीन वापर सुरू झाला आहे. परंतु यातील 5 लसींचे प्रकल्प प्रमुख ठरले आहेत. 5 ही लसी डिसेंबर ते एप्रिलपर्यंत उपलब्ध होणार आहेत. भारतात कोरोना लसीकरणासाठी सरकार कोविन ऍपची मदत घेणार आहे.

लसीकरणाच्या यादीत सामील करून व्यक्तीला त्याच्या आधारशी लिंक करण्यात येणार आहे. आधार नसलेल्या व्यक्तींसाठी कोणती पावले उचलली जाणार याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. औषध कंपन्या सुमारे 530 कोटी डोस तयार करणार असून यातील 270 कोटी म्हणजेच 51 टक्के डोस अमेरिका, ब्रिटन यासारख्या विकसित देशांना मिळणार आहेत.

ऍप ठेवणार नजर

लसीच्या संग्रहापासून आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय किंवा लसीकरण केंदापर्यंत ऍप मागोवा ठेवणार आहे. साठा संपुष्टात येत असल्यास ऍप त्याकरता नोटीफिकेशनही पाठविणार आहे. पूर्ण प्रवासात लसीच्या तापमानावर ऍपची नजर राहणार आहे.

ऍप देणार प्रमाणपत्र

कोविन ऍपद्वारे लोक लसीकरणाचे वेळापत्रक, स्थान आणि कुठली लस मिळणार याचा तपशीलही प्राप्त करू शकणार आहेत. एकदा लसीचा डोस घेतल्यावर ऍप एक प्रमाणपत्रही प्रदान करणार आहे.

ऍपमध्ये मोठा डाटा

ऍपमध्ये प्रंटलाइन वर्कर्स, 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे लोक आणि गंभीर आजारांना तोंड देणाऱया लोकांचा डाटा राहणार आहे. जिल्हा स्तरावर यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱयांचाही डाटा राहणार आहे.

लस साठवणूक सुविधा

भारतात मुलांसाठी राबविल्या जाणाऱया लसीकरण मोहिमांसाठी काही वॅक्सिन स्टोरेज चेन पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. परंतु मॉडर्ना आणि फायजर लसीचा संग्रह करण्यास त्या उपयुक्त ठरणार नाहीत.

विविध ठिकाणे केंद्रे

केंद्र सरकार लसउत्पादकांकडून थेट डोस खरेदी करणार आहे. तर लसीकरण केंद्रांसाठी वापर होऊ शकणाऱया इमारतींची निवड राज्य सरकारांकडून होत आहे. शाळा, ग्रामपंचायत आणि अंगणवाडी केंद्राची इमारतीचाही वापर होऊ शकतो. देशातील सर्व जिल्हय़ांमध्ये सुमारे 28,000 लससंग्रह केंद्रे असून ती ईविनशी जोडली गेलेली आहेत. परिवहनात सुमारे 40000 प्रंटलाइन वर्कर्स आहेत. साठय़ाचे तापमान तपासण्यासाठी सुमारे 50 हजार तापमान लॉगर्स आहेत. आरोग्य मंत्रालयाकडे इलेक्ट्रॉनिक वॅक्सिन इंटेलिजेन्स नेटवर्क म्हणजेच ईविन सारखा डिजिटल प्लॅटफॉर्म पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. सरकार याचा डाटा कोविन ऍपशी जोडू शकते.

  • मॉडर्ना : आपत्कालीन वापराच्या तयारीत. 94.5 टक्के प्रभावी. डिसेंबरमध्ये होणार उपलब्ध
  • फायजर : आपत्कालीन वापराची अनुमती मागितली. 95 टक्के प्रभावी. डिसेंबर होणार उपलब्ध.
  • एस्ट्राजेनेका : तिसऱया टप्प्याचे निष्कर्ष येणार. 95 टक्के प्रभावी. फेबुवारीत उपलब्ध होणार.
  • कोवॅक्सिन : तिसरी चाचणी सुरू. सुमारे 26 हजार लोकांवर होणार अंतिम टप्प्यातील चाचणी.

स्पुतनिक : दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू आहे. दोन डोस दिले जाणार.

    1800 ते 2700 मॉडर्नाचा एक डोस

मॉडर्ना कंपनीच्या लसीच्या एका डोसची किंमत 25 ते 37 डॉलर्सदरम्यान (सुमारे 1800 ते 2700 रुपये)दरम्यान असणार आहे. किती ऑर्डर मिळाली यावर त्याची किंमत अवलंबून असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बेंसेल यांनी दिली आहे. युरोपमध्ये लसीचा पुरवठा करण्यासाठी बोलणी सुरू असल्याचे म्हणत बेंसेल यांनी युरोपीय महासंघाच्या एका अधिकाऱयाचा लाखो डोसचा व्यवहार झाल्याचा दावा खोडून काढला आहे. मॉडर्नाचा अनेक देशांसोबत करार झाला आहे.

Related Stories

जगात वेगाने फैलावतोय नवा जीवघेणा आजार

Patil_p

चीनने लपविली कोरोना विषाणूची माहिती

Patil_p

ऍडोल्फ हिटलर निवडणुकीत विजयी

Patil_p

श्रीलंकेत चीनचा धोरणात्मक विजय

Patil_p

सुलेमानींच्या अंत्ययात्रेला लोटला जनसागर

Patil_p

इस्लाम स्वीकारण्यास हिंदू मुलीचा नकार

Patil_p
error: Content is protected !!