तरुण भारत

थिएम- मेदव्हेदेवमध्ये अंतिम लढत

लंडन : एटीपी टूरवरील वर्षअखेरीस येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या अंतिम टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रीयाचा डॉम्निक थिएम आणि रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.

या स्पर्धेत सुरूवातीला नदाल आणि जोकोव्हिच यांच्यात अजिंक्यपदासाठी लढत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण या दोन्ही टेनिसपटूंचे आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या मेदव्हेदेवने स्पेनच्या माजी टॉप सीडेड नदालचा 3-6, 7-6 (7-4), 6-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. यापूर्वी सलग 71 सामने जिंकणाऱया नदालची घोडदौड मेदव्हेदेवने रोखली. या स्पर्धेतील दुसऱया उपांत्य सामन्यात ऑस्ट्रीयाच्या थिएमने सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोव्हिचचा 7-5, 6-7 (8-10), 7-6 (7-5) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. जोकोव्हिचने यापूर्वी ही स्पर्धा पाचवेळा जिंकली होती.

Advertisements

Related Stories

‘त्या’ रोमांचक लढतीत स्टोक्सने घेतला होता ‘सिगारेट ब्रेक’!

Patil_p

देवेंद्र मुरगावकरच्या गोलने एफसी गोव्याची ईस्ट बंगालशी बरोबरी

Omkar B

इब्राहिमोव्हिक, लुकाकू यांना दंड

Patil_p

साईराज हुबळी टायगर्स, अलोन स्पोर्ट्स संघांचे विजय

Omkar B

पावसाळय़ानंतरच क्रिकेटची शक्यता : राहुल जोहरी

Patil_p

भारताचे माजी बॉक्सर डिंको सिंग यांना कोरोनाची बाधा

pradnya p
error: Content is protected !!