तरुण भारत

अमेरिकेत बाधितांची संख्या 1.25 कोटींवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेत 1 कोटी 25 लाख 89 हजार 088 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 62 हजार 701 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

अमेरिकेत रविवारी 1 लाख 37 हजार 010 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 871 जणांचा मृत्यू झाला. 1.25 कोटी कोरोना रूग्णांपैकी 74 लाख 52 लाख 616 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 48 लाख 73 हजार 771 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 23 हजार 113 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 18 कोटी 06 लाख 73 हजार 023 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

टेक्सास, कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण

अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 11 लाख 78 हजार 711 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 21 हजार 165 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 11 लाख 16 हजार 056 जणांना बाधा झाली असून, 18 हजार 727 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 6 लाख 34 हजार 035 रुग्ण आढळून आले. त्यामधील 34 हजार 233 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार

prashant_c

फिलिपाईन्समध्ये चक्रीवादळाचे थैमान; 100 जणांचा मृत्यू

datta jadhav

‘हे’ घर भाडय़ाने देणे आहे

Patil_p

फ्लॉयड हत्येप्रकरणी पोलीस अधिकारी दोषी

Patil_p

अमेरिकेतील लोकांचे सरासरी आयुर्मान घटले

Amit Kulkarni

नेपाळ नरमला, भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी हटविली

Patil_p
error: Content is protected !!