तरुण भारत

पोलीस भरती परीक्षेत बोगस परीक्षार्थी

बेळगावात चौघा जणांना अटक : रॅकेटचे मूळ गोकाक तालुक्मयातील मुडलगी : पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांची माहिती

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

पोलीस भरतीसाठी रविवारी बेळगाव येथील 39 परीक्षा केंद्रांवर सीईटी परीक्षा झाल्या. या परीक्षेत चौघा बोगस परीक्षार्थींना अटक करण्यात आली आहे. यासंबंधी उद्यमबाग, माळमारुती, टिळकवाडी, शहापूर पोलीस स्थानकात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकाच्या नावे दुसऱयाने परीक्षा लिहिणाऱया टोळीचा केंद्रबिंदू गोकाक तालुक्मयातील मुडलगी परिसरात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. संपूर्ण राज्यात ही टोळी कार्यरत आहे.

यासंबंधी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून रविवारी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत एसआरपीसी, आयआरबी, केएसआरपी, पुरुष व महिला पोलीस भरतीसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. बेळगाव शहर व उपनगरांतील 39 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली. 11 हजार 921 पैकी 8 हजार 461 परीक्षार्थी परीक्षेसाठी हजर होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

उद्यमबाग येथील जीआयटी कॉलेज, माळमारुती येथील लवडेल सेंट्रल स्कूल, केएलएस संस्थेचे इंग्लिश मिडियम हायस्कूल टिळकवाडी व शहापूर येथील चिंतामणराव पदवीपूर्व महाविद्यालयात एकाच्या नावे भलत्याच परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिल्याचे प्रकार घडले आहेत. अशा प्रकारात गुंतलेल्यांवर भादंवि 465, 468, 420, 471, 419 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

भीमशी महादेव हुल्लोळी (वय 24) रा. हडगीनहाळ, ता. गोकाक, सुरेश लक्ष्मण कडबी (वय 25) रा. बेनचिनमर्डी, ता. गोकाक, आनंद हणमंत वडेयर (वय 28) रा. उदगट्टी, ता. गोकाक, मेहबूब बाबासाब अक्किवाट (वय 23) रा. उदगट्टी, ता. गोकाक अशी अटक केलेल्या चौघा जणांची नावे आहेत. माळमारुती पोलिसांनी अटक केलेला मेहबूब हाच मूळ परीक्षार्थी असला तरी त्याची सही बदलल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

रविवारी झालेल्या परीक्षेत हुबळी-धारवाड, चित्रदुर्ग, बळ्ळारी, बेंगळूर येथेही बोगस परीक्षार्थींना अटक झाली असून या सर्व प्रकारांचे मूळ गोकाक तालुक्मयातील मुडलगी येथे आहे. हुबळी-धारवाड येथे तर अंकलगी पोलीस स्थानकातील एका पोलिसाला अटक झाली आहे. दुसऱयाच्या नावे परीक्षा देताना त्याला अटक करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा पास करून देण्यासाठी मोठी रक्कम घेऊन मूळ परीक्षार्थ्यांच्या बदल्यात भलतेच उमेदवार परीक्षा देतात. यामध्ये अनेक जण सध्या पोलीस दलात कार्यरत असणारे आहेत. तर आणखी काहीजण प्रशिक्षण घेतलेले आहेत. खास करून गोकाक तालुक्मयात यासाठी मोठी टोळी कार्यरत आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीची पाळेमुळे खणण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. या टोळीचा म्होरक्मया कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बेळगाव येथे रविवारी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांच्या चौकशीतून म्होरक्मयाचे नाव उघडकीस आले असून गोकाक तालुक्मयातील बिरनगड्डे येथील तो राहणारा आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात येत होता. बेळगाव पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पोलीस दलात भरती होण्यासाठी सतत अभ्यास करणाऱया गोरगरीब विद्यार्थ्यांवर अशा भामटय़ामुळे अन्याय होतो. म्हणून या भामटय़ांची पाळेमुळे खणून काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

रविवारी झालेल्या परीक्षेत हुबळी-धारवाड, चित्रदुर्ग, बळ्ळारी, बेंगळूर येथेही बोगस परीक्षार्थींना अटक झाली असून या सर्व प्रकारांचे मूळ गोकाक तालुक्मयातील मुडलगी येथे आहे. हुबळी-धारवाड येथे तर अंकलगी पोलीस स्थानकातील एका पोलिसाला अटक झाली आहे. दुसऱयाच्या नावे परीक्षा देताना त्याला अटक करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार पोलीस भरतीसाठीची लेखी परीक्षा पास करून देण्यासाठी मोठी रक्कम घेऊन मूळ परीक्षार्थ्यांच्या बदल्यात भलतेच उमेदवार परीक्षा देतात. यामध्ये अनेक जण सध्या पोलीस दलात कार्यरत असणारे आहेत. तर आणखी काहीजण प्रशिक्षण घेतलेले आहेत. खास करून गोकाक तालुक्मयात यासाठी मोठी टोळी कार्यरत आहे.

 जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीची पाळेमुळे खणण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. या टोळीचा म्होरक्मया कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बेळगाव येथे रविवारी अटक केलेल्या चौघा जणांच्या चौकशीतून म्होरक्मयाचे नाव उघडकीस आले असून गोकाक तालुक्मयातील बिरनगड्डे येथील तो राहणारा आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात येत होता. बेळगाव पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

पोलीस दलात भरती होण्यासाठी सतत अभ्यास करणाऱया गोरगरीब विद्यार्थ्यांवर अशा भामटय़ामुळे अन्याय होतो. म्हणून या भामटय़ांची पाळेमुळे खणून काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

रंगेहाथ सापडलेल्या पोलिसाला दिले सोडून!

गेल्या महिन्यात डीएआर व सीएआर भरतीसाठी परीक्षा झाली होती. रविवार दि. 18 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा झाली होती. यावेळीही तिघा जणांना अटक झाली होती. कृष्णा ऐहोळे (वय 21) रा. मल्लापूर पी. जी., रोहन शंकर जोडट्टी (वय 20), त्याचे वडील शंकर जोडट्टी (वय 43) अशी त्यांची नावे आहेत. बेळगाव ग्रामीण व टिळकवाडी पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचवेळी भलत्याच उमेदवाराच्या नावे परीक्षा लिहिताना सीएआरमधील एक जवान रंगेहाथ सापडला होता. मात्र, त्याला सोडून देण्यात आले, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्याचवेळी त्याच्यावर एफआयआर दाखल करून त्याच्या मुसक्मया आवळल्या असत्या तर पोलीस दलात भीती निर्माण झाली असती. मात्र, त्याच्या नोकरीवर गदा नको, यासाठी त्याला सोडून देण्यात आले होते. हा पोलीसही या रॅकेटचा भाग असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Related Stories

यल्लापूरनजीक अपघातात चौघे जण जागीच ठार

Patil_p

कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. सदस्यांची ‘तरुण भारत’ला सदिच्छा भेट

Patil_p

सुरेश अंगडी यांचे दिल्लीत स्मारक निर्माण करा

Omkar B

मण्णूर प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नाईट रायडर्स विजेता

Patil_p

खानापूर रोडवरील कुंटणखान्यावर धाड

Patil_p

सीमावासियांना वैद्यकीय शिक्षणाचा कोटा वाढवून द्या

Omkar B
error: Content is protected !!