तरुण भारत

नेसाय येथे आज रेल्वेमार्गाच्या सीमांकनाच्या विरोधात निदर्शने

प्रतिनिधी / मडगाव

सांव जुझे दी आरियल येथील नेसाय रेल्वे गेटजवळ आज सोमवार दि. 23 रोजी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने रेल्वेमार्गाच्या सीमांकनाच्या विरोधात निदर्शने केली जाणार आहेत. स्थानिक पंचायतीने 2013 पासून रेलमार्गाच्या दुपदरीकरणाच्या विरोधात ठराव घेतले होते. ग्रामसभांनी देखील त्यावर चर्चा झाली होती. मात्र, त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नव्हता.

Advertisements

सद्या दुपदरीकरणाचे काम रेल्वे विकास निगमने हाती घेतले आहे व रेल्वेमार्गाच्या सीमां नक्की केल्या जात आहे. त्याला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आज ग्रामस्थ पुन्हा एकदा मोठय़ा संख्येने या निदर्शनात सहभागी होण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजल्यापासून रेल्वे गेट जवळ ही निदर्शने केली जाणार आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

21 जणावर गुन्हा नोंद

दरम्यान, दवर्ली येथे रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला विरोध करणाऱया एकूण 21 जणांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 21 जणापैकी दोघांची ओळख पोलिसांना पटली असून त्यात मॅक्सन फर्नांडिस व फ्रान्सिस कुलासो याचा समावेश आहे. उर्वरित 19 जणांची ओळख पटविणे रेल्वे पोलिसांना शक्य झालेले नाही.

रेल्वे कायदा 1989 खाली 21 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या सर्वांनी रेल्वेच्या जागेत जबरदस्तीने प्रवेश करून या ठिकाणी काम करणाऱया कामगारांना धमकावल्याची तक्रार रेल्वे विकास निगमचे अभियंते अविनाश गुंटूपाली यांनी रेल्वे पोलीस स्थानकात केली होती.

बेकायदेशीर जमाव करणे तसेच रेल्वे कामगारांना धमकावण्याच्या गुन्हय़ा खाली 21 जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 356, 379, 506 कलमाखाली तसेच भारतीय रेल्वेच्या कायद्याच्या कलम 146, 147 आणि 151 कलमाखाली गुन्हा नोंद झाल्याची माहिती रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक हिरू कवळेकर यांनी दिली आहे.

Related Stories

एकाच रात्रीत 15 ट्रकांच्या बॅटऱया गायब.

Amit Kulkarni

मागण्या मान्य न झाल्यास न्यायालयात जाणार

Patil_p

चार महिन्यानंतर पिसुर्ले सत्तरी नवदुर्गा देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले

Patil_p

रुग्णवाहिका उपलब्ध करूनही परवानगीविना पडून

Amit Kulkarni

शिरगावात मंगळवारी देवी लईराईचा लालखी उत्सव

Amit Kulkarni

साळगावकरचे चर्चिलवर ‘पंचतारांकित’ गोल; स्टिफनची हॅट्ट्रिक

Amit Kulkarni
error: Content is protected !!