तरुण भारत

अखेर शैक्षणिक घंटा वाजू लागली

शासकीय नियमांचे पालन करत विद्यार्थी वर्गामध्ये दाखल

उदगाव / वार्ताहर

गेले कित्येक महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांविना बंद असलेली शैक्षणिक संस्था आज कडक नियमांचे पालन करत सुरू करण्यात आली. कित्येक महिने शैक्षणिक संस्थेमध्ये बंद असलेली शाळेची घंटा पुन्हा वाजू लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी विद्यार्थी वर्गामध्ये शाळा सुरू झाल्याने उत्साह दिसून येत होता.
येथील डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल, उदगांव या संस्थेमध्ये सोमवारी दहावीचे वर्ग शासनाच्या नियमांचे पालन करत सुरू करण्यात आले. मंगळवारी नववीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. आज सोमवारी सत्तरच्या आसपास विद्यार्थी-विद्यार्थिनी पालकांची संमती पत्रे घेऊन शाळेत उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सैनीटायझर, मास्क थर्मल टेस्टिंग तसेच सोशल डिस्टन्स या सर्व नियमांचे पालन करीत वर्ग भरण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये अजूनही कोरोनाच्या सावटाखाली उत्साह दिसत होता.

Advertisements

Related Stories

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : रासपची मागणी

Patil_p

शिवरायांची राजमुद्रा वापरणे हा शिवरायांचा अवमान : श्रीमंत कोकाटे

triratna

कोल्हापूर हायकर्सच्या मावळ्यांनी सर केला आव्हानात्मक लिंगाणा

triratna

चार मंत्र्यांच्या दौयामुळे तारळी योजनेस चालना : डॉ. येळगावकर

Patil_p

साताऱ्यात आज ७ नागरिकांना डिस्चार्ज तर १२६ नमुने पाठवले तपासणीला

triratna

संजय जाधवांच्या ‘त्या’ विधानावर केशव उपाध्ये म्हणतात, तुम्ही हवं ते करा पण…

triratna
error: Content is protected !!