तरुण भारत

दिवसभरात कोरोनाचे दोन बळी

लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता

प्रतिनिधी

Advertisements

पणजी

गेल्या चोवीस तासांत गोव्यात कोरोनामुळे दोन बळी गेले असून मृतांचा एकूण आकडा 677 वर पोहोचला आहे. काल रविवारी 78 नवे बाधित सापडले तर 167 जण बरे होऊन घरी परतले. सध्या 1170 सक्रिय कोरोना रुग्ण असून ते विविध हॉस्पिटलमध्ये व कोविड सेंटरात उपचार घेत आहेत. संशयित रुग्ण म्हणून 31 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले असून 38 जणांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 46826 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 44979 जणांना कोरोनापासून मुक्ती मिळाली आहे.

विविध आरोग्यकेंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

डिचोली -27, सांखळी -32, पेडणे 29, वाळपई – 15, म्हापसा 52, पणजी 84, हळदोणे 13, बेतकी 23, कांदोळी 64, कासारवर्णे 8, कोलवाळ 33, खोर्ली 39, चिंबल 50, शिवोली 41, पर्वरी 82, मये 9, कुडचडे 17, काणकोण 19, मडगाव 87, वास्को 70, बाळ्ळी 14, कासावली 34, चिंचिणी 22, कुठ्ठाळी 51, कुडतरी 15, लोटली 21, मडकई – 13, केपे 23, सांगे 14, शिरोडा 20, धारबांदोडा 24, फोंडा 90, नावेली 35.

गोव्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या कमी कमी होत असल्याने थोडा दिलासा मिळत असला तरी मृतांचे प्रमाण थांबत नाही. त्यामुळे लोकांनी अजूनही बरीच सावधगीरी बाळगण्याची आवश्यकत आहे. शाळेत जाणाऱया विद्यार्थ्यांचीही खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

22 नोव्हेंबरपर्यंतचे एकूण रुग्ण46826
22 नोव्हेंबरपर्यंत बरे झालेले रुग्ण44979
22 नोव्हेंबर रोजी सक्रिय रुग्ण1170
22 नोव्हेंबरचे नवीन रुग्ण78
22 नोव्हेंबर रोजी बरे झालेले रुग्ण167
22 नोव्हेंबरचे कोरोना बळी2
आतापर्यंतचे एकूण बळी677

Related Stories

फोंडय़ात पोलीस अधिकाऱयावर प्राणघातक हल्ला

Patil_p

ढवळीकरांना घराणेशाहिची भाषा शोभत नाहि प्रदीप शेट यांचा आरोप

GAURESH SATTARKAR

कुडचडे नगरपालिकेची बैठक गणपूर्तीच्या अभावी बारगळली

Amit Kulkarni

साठ वर्षांत गोव्याची चौफेर विकासाकडे झेप

Amit Kulkarni

मडगाव पालिकेकडून जाता जाता शुल्कवाढीचा ‘शॉक’

Patil_p

चॅलेंजर्स यू-19 क्रिकेट स्पर्धेसाठी उदीत यादव,सावली कोळंबकरची निवड

Patil_p
error: Content is protected !!