तरुण भारत

म्हसवडच्या श्री सिद्धनाथ जोगेश्वरीचे अतिकडक एका पायावरचे “उभ्या नवरात्राचे व्रत” सुरु

प्रतिनिधी / म्हसवड

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ,लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवड गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी  यांच्या संपूर्ण एक महिना चालणाया शाही विवाह सोहळ्याची धामधूम सध्या सुरु असून दीवाळी पाडवा ते तुलसी विवाह या12 दिवसाच्या दरम्यान परंपारिक पद्धतीने व पूर्वापार चालत आलेला ह्या सोहळ्याची सुर्वात दिपावलीच्या अभ्यंगसनाने बारा दिवसाचे उभे उपवास व रथ मार्गावर पंचामृताची प्रदक्षीना पहाटे चार वाजले पासुन हजारो नाथ भक्त सिध्दनाथ जोगेश्वरीचा ओव्यतुन गजर करत अबाल वृध्द, महिला पुरुष अनवाणी पायानी प्रदक्षिना 12 दिवस घालतात

Advertisements

          या एक महिन्याच्या विवाहसोहळ्यातील सर्वात महत्वाचे व मुख्य असे हे 12 दिवस समजले जातात. कार्तिक शु.प्रतिपदा (दीपावली पाडवा)ते कार्तिक शु. प्रतिपदा(तुलसी विवाह) दरम्यान, दिवाळी पाडव्यादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिरातील मुख्य पुजारी -सालकरी यांच्या हस्ते घटस्थापना केली जाते,या घटस्थापनेच्या दिवसापासून म्हणजे दिपावली पाडव्यापासून हे नवरात्र सुरु होत असले तरी पाडव्यादिवशी पहाटे जेव्हा जाग येईल तेव्हापासूनच उभे नवरात्र करणारांना उभे रहावे लागते.व पूर्ण बारा दिवस श्रींचा जप करीत,शुद्ध मनाने ,आचरणाने,पावित्र्य राखून,उभे राहूनच श्रींची उपासना भक्त करतात या  “उभ्या नवरात्रा”चेअतिशय कडक एका पायावर उभे राहणे ,जमिनीवर न झोपणे, भक्तांनी दिलेले उपवासाचे फरहाळ खाने अशा पद्दतीचे  उपवास( व्रत) सध्या सिद्धनाथ मंदिरात सुरु झाले आहे. 

           म्हसवड येथील माणगंगेच्या तिरावर दहाव्या शतकातील अत्यंत प्राचिन असे हेमाडपंथी मंदीर उभे आहे.,तेव्हापासून आज अखेर या मंदिरात परंपरागत चालत आलेल्या अनेक धार्मिक उपासना व अत्यंत कडक अशा व्रतांची अखंड आणि अव्याहत प्रथा अत्यंत मनोभावे सुरु असून”उभे नवरात्र”ही अतिशय कडक  आणि कठीण अशी उपासना आहे.

           अनेक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अराध्य दैवत असलेल्या येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीदेवतांचा पूर्वापार चालत आलेल्या रुढी-परंपरेनुसार हळदी,-विवाह-आणि वरात या मंगल विवाहाच्या पाय्रया आहेत त्यानुसारच श्रींचा तब्बल एक महिना चालणारा विवाह सोहळा अनेक धार्मिक  कार्यक्रमांसह साजरा केला जातो. मात्र आता कोरोनाच्या। पार्श्वभूमीवर शासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असल्याने शासन नियमांच्या अधीन राहूनच सर्व कर्यक्रम उरकावे लागणार आहेत.

      गुरुवार 26 नोव्हेंबर(तुलसी विवाह)रोजी पहाटे साडेपाच वाजता हे 12 दिवसाचे घट उठणार असून श्रींचे नवरात्राचे उपवास सुटणार आहेत .त्याच दिवशी रात्री 12 वाजता श्रींचा शाही मंगल विवाह सोहळा पारंपारिक व धार्मिक विधीपूर्वक,पण शासन नियमानुसार पार पडणार आहे.

           दरवर्षी हे सर्व कर्यक्रम मोठय़ा जल्लोषात व उत्साहात पार पाडले जातात,मात्र यावर्षी कोरोनामुळे शासन नियमानुसारच मंदिराच्या अंतर्गत भागातच मोजक्याच लोकांमध्ये सर्व कार्यक्रम उरकायचे असल्याने तमाम भाविकांनी याची नोंद घेऊन यावेळी मंदिरात येणे टाळावे,व मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करावे असे आवाहन श्री सिध्दनाथ देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

Related Stories

आमदार शिवेंद्रसिंहराजे बनले कॅरमपट्टू

Patil_p

नागपंचमी उत्साहात साजरी

Patil_p

जिल्हाबंदीची कडक अंमलबजावणी करा; मंत्री देसाई यांचे पोलिसांना आदेश

datta jadhav

सातारा : लॉकडाऊनमध्ये भाजी विक्री व्यवसाय फॉर्ममध्ये

Abhijeet Shinde

सुखःवार्ता; पंधरवड्यात दुसरी लाट ओसरतेय

datta jadhav

आता तहसील कार्यालयाच्या परिसरातील हॉटेलवाला करु लागला पे ऍण्ड पार्क

Patil_p
error: Content is protected !!