तरुण भारत

सातारा जिल्ह्यात बाधितांची संख्या 50 हजार पार

सातारा, प्रतिनिधी

जिल्हय़ात एकीकडे कोरोनाचा कहर थंडावला, थांबला नाही पण शाळांसह सर्व काही गोष्टी सुरु झाल्या असतानाच दुसऱया लाटेची चर्चा नागरिकांची चिंता वाढवत आहे. दुसऱया लाटेच्या चर्चेबरोबरच जिल्हय़ात पुन्हा लॉकडाऊन होणार, अशा अफवाही पिकल्या जात असताना आजमितीस बाधितांची संख्या 50 हजारांच्या पार झाली. त्यापैकी 47,122 जणांनी कोरोनावर मात केली असल्याचा दिलासा घेत कोरोनाविरुध्दची लढाई सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हय़ात सोमवारी ज्ञानमंदिरे खुली झाली आहेत.

दरम्यान, सोमवारी सायंकाळी अहवालात 49 रुग्णांना ते बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर गेल्या 24 तासात फक्त 2 बाधितांचा उपचार सुरु असताना मृत्यू झालाय. रात्री उशिरा आलेल्या अहवालात 224 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिलीय.

नागरिकांमध्ये लॉकडाऊनची अफवा
देशभरात काही ठिकाणी तसेच परदेशात दुसऱया लाटेने जोर धरला असला तरी सध्या सातारा जिल्हय़ात कोरोनाचा कहर कमी होतोय. कमी संख्येने बाधित रुग्ण आढळून येत असले तरी परिस्थिती आटोक्यात येण्याचा दिलासा त्यात आहे. मात्र, सध्या जिल्हय़ात पुन्हा लॉकडाऊन होणार अशी अफवा चर्चिला जात आहे. दुसऱया लाटेबाबतही नागरिकांमध्ये चर्चा सुरु असून त्यातच शाळा, महाविद्यालये सुरु झाली असली तरी असंख्य विद्यार्थ्यांनी शाळांकडे पाठ फिरवल्याचे चित्र सोमवारी अनुभवास आले आहे.

फलटण, साताऱयात अधिक रुग्ण
रविवारी रात्रीच्या अहवालात पाच तालुक्यात दोन अंकी संख्येने रुग्ण वाढ झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त 40 फलटण तालुका आहे तर सातारा तालुक्यात 33 नवे बाधित समोर आलेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत काळजी घेण्याची गरज अधिक वाढू लागलीय. कराडकर सावरु लागले असून कराडत फक्त 6 नवे रुग्ण समोर आलेत. जावली, महाबळेश्वरची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु असून आता दुसऱया लाटेच्या चर्चेला न घाबरता काळजी घेवूया अन कोरोनाला हरवूया हेच ब्रीद आचरणात आणावे लागणार आहे.

जिल्हय़ात 2 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये देगाव ता. सातारा येथील 62 वर्षीय महिला तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये ओगलेवाडी ता. कराड येथील 82 वर्षीय महिला अशा एकूण 2 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

349 जणांचे नमुने तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा 28, कराड 21, फलटण 24, कोरेगांव 31, वाई 36, खंडाळा 28, रायगाव 1, पानमळेवाडी 6, मायणी 18, महाबळेश्वर 25, पाटण 9, दहिवडी 22, खावली 5, तळमावले 20, म्हसवड 15, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 60 असे एकूण 349 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

आज रविवारची स्थिती
एकूण बेड ………..6,009
एकूण उपचारार्थ …. 1,074
दाखल रुग्ण ………..641
होम आयसोलेट ……433
रिक्त बेड ………….4,935

कोरोना केअर सेंटर
(क्षमता 3,295 पैकी दाखल 231)
रिक्त बेड 3,064

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर डीसीएचसी
आणि
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल डीसीएच
(2,714 क्षमतेपैकी दाखल 641)
रिक्त बेड 2,100

दवाखान्यात दाखल 641 पैकी
ऑक्सिजनशिवाय : 97 (क्षमता 711) रिक्त 614
ऑक्सिजनसह : 387 (क्षमता 1,541) रिक्त 1,154
आयसीयू : 157 (क्षमता 462) रिक्त 305

सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 2,35,699
एकूण बाधित 50,103
एकूण कोरोनामुक्त 47,122
मृत्यू 1,683
उपचारार्थ रुग्ण 1,298

सोमवारी
एकूण बाधित 224
एकूण मुक्त 49
एकूण बळी 02

Related Stories

महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात मनोज कदम, ऋषिकेश देशमुख

Amit Kulkarni

सातारा जिल्हा रुग्णालय समस्यांच्या गर्तेत,वर नागरिकांच्या आजारपणाला ही निमंत्रण

triratna

सातारा पालिकेच्या विषय समितीच्या निवडीची विशेष सभा सोमवारी

Patil_p

अजिंक्यतारा वरुन येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करा

Shankar_P

थॅलेसिमिया रूग्णाला रक्त देण्यास नकार

datta jadhav

‘साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी प्रश्नी साखर आयुक्तांना घेराव घालणार’

triratna
error: Content is protected !!