तरुण भारत

माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन

इस्पितळात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास

गुवाहाटी / वृत्तसंस्था

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे सोमवारी सायंकाळी गुवाहाटी येथे निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 84 वर्षे होते. वृद्धापकालीन आजारांमुळे इस्पितळात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यासंबंधी ट्विटरवर माहिती देत आपले नियोजित कार्यक्रम-दौरे रद्द केले आहेत. गोगोई यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोकभावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

तरुण गोगोई हे 25 ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. कोरोनावर मात केल्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. तेव्हापासून गोगोई यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. त्यांना गुवाहाटी मेडिकल महाविद्यालयातील रुग्णालयामधील व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली.

50 वर्षांहून अधिक राजकीय कारकीर्द

तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत सलग तीनवेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी 50 वर्षांहून अधिक काळ राजकीय कारकीर्द गाजवली आहे.

 त्यांनी काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. आसाम विधानसभेच्या 2021 मध्ये होणाऱया निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी तयार करण्याचा तरुण गोगोईंचा प्रयत्न होता. तरुण गोगोईंच्या नेतृत्वात काँग्रेसने आसमाममध्ये 2001, 2006 आणि 2011 मध्ये विजय मिळवला होता. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तरुण गोगोई तिटाबार विधानसभा मतरादसंघातून विजयी झाले पण काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला होता.

राष्ट्रपती-पंतप्रधानांकडून शोक

तरुण गोगोई यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त करताना, ‘गोगोई हे लोकप्रिय नेते आणि कुशल प्रशासक होते. केंद्र आणि आसामच्या राज्य सरकारमध्ये त्यांना कामकाजाचा मोठा अनुभव होता.’  असे म्हटले आहे. तसेच गोगोई यांच्या निधनामुळे दु:ख झाल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

तरुण गोगोईंची उणीव जाणवेल : राहुल गांधी

तरुण गोगोई खरेखुरे काँग्रेस नेते होते. त्यांनी त्यांचे जीवन आसाममधील सर्व समाजाच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी अर्पण केले. तरुण गोगोई माझे शिक्षक होते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमाची आणि आदराची भावना होती, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या. आसाममध्ये काँग्रेसच्या वाटचालीत तरुण गोगोई यांनी मोलाची भूमिका बजावली होती, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Related Stories

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अद्याप स्थिर

Patil_p

देशात 52,050 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 18.5 लाखांवर

datta jadhav

राज्यातील मॉल, पब आठवडाभर बंद

tarunbharat

तामिळनाडूला चक्रीवादळाचा धोका

Omkar B

देशात 36,469 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

उत्तराखंडात 305 नवे कोरोना रुग्ण

pradnya p
error: Content is protected !!