तरुण भारत

सराव सामन्यात पुनरागमन करण्याचा मार्शचा विचार

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श याला गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले आहे पण पुढील महिन्यात होणाऱया भारत अ संघाविरूद्धच्या सराव सामन्यामध्ये तो खेळण्याची शक्यता आहे. या सामन्यात पुनरागमन करण्याबाबत आपण आशावादी आहोत, असेही मार्शने म्हटले आहे. 29 वर्षीय मार्शला गेल्या सप्टेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात खेळताना घोटय़ाला दुखापत झाली होती. त्या दुखापतीमुळे त्याला ही स्पर्धा अर्धवट सोडावी लागली. ऑस्ट्रेलिया अ संघामध्ये मिशेल मार्शचा समावेश करण्यात आला आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील तीन दिवसांचे दोन सामने अनुक्रमे 6 ते 8 डिसेंबर आणि 11 ते 13 डिसेंबर दरम्यान खेळविले जाणार आहेत. भारताविरूद्ध होणाऱया चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 17 जणांच्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये मिशेल मार्शला वगळण्यात आले आहे.

या दुखापतीतून लवकरच आपण पूर्णपणे तंदुरूस्त होत असून राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी मी उत्सुक आहे, असेही मार्शने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Related Stories

बीसीसीआय मध्यवर्ती करारातून धोनीला डच्चू

Patil_p

चीनमधील सहा फुटबॉलपटूंवर बंदी

Patil_p

टी-20 मालिकेतून तमिम इक्बालची माघार

Amit Kulkarni

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या संचालकपदी ग्रीम स्मिथ

Patil_p

ऐच्छिक नेमबाजी शिबीर लांबणीवर

Patil_p

ऑस्ट्रेलिया-अफगाण कसोटी लांबणीवर

Patil_p
error: Content is protected !!