तरुण भारत

ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर जानेवारीत येणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भाडेतत्त्वावर वाहन उपलब्ध करणाऱया ओला कंपनीला आता आपली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणायची घाई झाली आहे. येणाऱया काळात या नव्या व्यवसायात अधिक लक्ष देणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून समजते. पुढील वर्षारंभी जानेवारीत ओलाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल होणार असल्याचे संकेत आहेत. त्यासाठी कंपनीने तयारीवर जोर दिला आहे. सुरुवातीला या स्कूटरची निर्मिती नेदरलँडमध्ये केली जाणार आहे, तेथूनच या स्कूटरची भारतासह युरोपच्या बाजारपेठेत विक्रीकरता रवानगी होणार आहे. काही महिन्यांपूर्वी ऍमस्टरडॅममधील इटर्गो बीव्ही या कंपनीचे अधिग्रहण कंपनीने केले होते. कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार आहे. भारतातच इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीची योजना आखलेली आहे.

Advertisements

दहा लाख स्कूटर विक्रीचे लक्ष्य

पहिल्या वषी दहा लाख स्कूटर्स विक्री करण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे. ओलाच्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत इतरांच्या तुलनेमध्ये किफायतशीर असणार असल्याचे सांगितले जात आहे. ही गाडी इतर स्पर्धक कंपन्यांच्या गाडय़ांना चांगली टक्कर देईल असेही बोलले जात आहे. वर्चस्व प्रस्थापीत करण्यासाठी कंपनीचा प्रयत्न असून पहिल्या वर्षात 10 लाख स्कूटर्स विक्रीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

Related Stories

‘उसळी’चे संकेत

Omkar B

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये होतेय घसरण

Patil_p

जीपीएफच्या व्याजदरात कपात

Patil_p

2021 पर्यंत झोमॅटोकडून आयपीओ आणण्याची शक्मयता

Patil_p

नववर्षात बाजाराचे स्वागत तेजीसोबत

Patil_p

…….. सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजीची झुळूक

Patil_p
error: Content is protected !!