तरुण भारत

महाराष्ट्रात 4,153 नवे कोरोना रुग्ण; 30 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 4,153 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 30 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 17 लाख 84 हजार 361 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 46 हजार 653 एवढा आहे.

Advertisements

 
कालच्या एका दिवसात 3,729 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 16 लाख 54 हजार 793 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 92.74 % आहे. मृत्यू दर 2.61 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 02 लाख 81 हजार 543 नमुन्यांपैकी 17 लाख 84 हजार 361 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 05 लाख 17 हजार 711 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 6 हजार 524 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

झोपलेल्या पत्नीचे डोके आपटून खून

Patil_p

जगभरात 6 लाखांहून अधिक कोरोनाबळी

datta jadhav

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन : मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Abhijeet Shinde

अवघ्या तीन तास चाळीस मिनिटांमध्ये 1008 योग सूर्यनमस्कार घालून डोळ्याचे पारणे फेडले

Abhijeet Shinde

झूमच शिक्षण राहू द्या..आदी भाकर द्या!

Patil_p

बंगाल : माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे उमेदवार अशोक दिंडा यांना Y+ सुरक्षा

Rohan_P
error: Content is protected !!