तरुण भारत

बेनकनहळ्ळी पीडीओंचा मनमानी कारभार थांबवा

ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : गरज नसताना सरस्वतीनगर येथे सभागृह बांधण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीच्या प्रभारी ग्राम विकास अधिकारी सुजाता बडकुंद्री या मनमानीपणे आलेला निधी खर्च करत आहेत. कोणतीही गरज नसताना सरस्वतीनगर येथे सीमदेवाच्या जागेमध्ये सभागृह बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. केवळ कमिशनसाठी हा प्रकार सुरू असून तातडीने तो थांबविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बेनकनहळ्ळी ग्रामस्थ पंचकमिटीच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

मागील वषी 20 ते 22 लाख रुपये खर्च करून ग्राम पंचायत इमारतीची उभारणी करण्यात आली. त्या ठिकाणी बैठक हॉल तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध  आहेत. असे असताना प्रभारी ग्राम विकास अधिकारी सुजाता बडकुंदी या खुल्या जागेमध्ये सभागृह बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोणालाही विश्वासात न घेता हा प्रकार सुरू असून तातडीने संबंधित अधिकाऱयाला समज द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

परस्पर निर्णय घेऊन निधीचा दुरुपयोग सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारे निधी खर्च करण्यापेक्षा पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.

भरमा हणमंत देसूरकर, विठ्ठल पाटील, महेश पाटील, मोहन कांबळे, एम. बी. देसूरकर, कल्लाप्पा पाटील, रामा नेमाणी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

फलोत्पादन खात्याकडून उपनगरात भाजीपाला पुरवठा

tarunbharat

नित्यानंद कोटियन मि. कर्नाटक श्री किताबाचा मानकरी

Amit Kulkarni

भारतीय टपाल सेवेला आधुनिकतेची कास

Amit Kulkarni

दोन दिवसात कोरोनाचे 24 नवे रुग्ण

Amit Kulkarni

भाग्यनगर येथे साकारला सुवर्णदुर्ग

Patil_p

बेळगाव जिह्यात कोरोना बळींची मालिका सुरुच

Rohan_P
error: Content is protected !!