तरुण भारत

काणकोणात मास्क न वापरता फिरणाऱया 60 जणांना दंड

प्रतिनिधी / काणकोण

काणकोणच्या पोलिसांनी मास्क न वापरणाऱयांवर कडक कारवाई सुरू केली असून 22 रोजी एकाच दिवशी मास्क न वापरता फिरणाऱया 60 जणांना दंड दिला. काणकोणच्या किनारपट्टीवर सध्या देशी पर्यटक गर्दी करायला लागले आहेत. सीमेवरून गोव्यात प्रवेश करताना परिधान केलेले मास्क गोव्यात प्रवेश केल्यानंतर बरेच जण वापरत नाहीत असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हमरस्त्यावर देखील पोलिसांनी तपासणी चालू ठेवली असल्याची माहिती काणकोणचे निरीक्षक प्रवीण गावस यांनी दिली. कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. शाळा सुरू झालेल्या आहेत. शिवाय महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या भागांतून मोठय़ा प्रमाणात पर्यटक गोव्याकडे यायला लागले आहेत. अशा वेळी आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे मत गावस यांनी व्यक्त केले.

Advertisements

Related Stories

काणकोणात कारला अपघात एका महिलेचा मृत्यू

Patil_p

गोविंद गावडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Sumit Tambekar

वारखंडेकर मंडळातर्फे जीवनावश्यक वस्तू वितरित

Omkar B

‘त्या’ बालिकेला दत्तक घेण्यासाठी अनेकजण उत्सुक

Amit Kulkarni

अंजुणे धरणाच्या जलाशयाची पातळीत वाढ

Amit Kulkarni

काणकोणात 800 कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

Patil_p
error: Content is protected !!