तरुण भारत

न्यायालयातील कर्मचाऱयांविरुद्ध सरन्यायाधीशांकडे तक्रार

पणजी / प्रतिनिधी

काँग्रेस पक्षातून फुटून भारतीय जनता पक्षात गेलेल्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच न्यायालयात सादर केलेली याचिका अजूनही अंतिम सुनावणीसाठी लागत नसल्याने याचिकादार गिरीश चोडणकर यांनी न्यायालयातील कर्माचाऱयांविरुद्ध सरन्यायाधीशांकडे तक्रार केली आहे. सदर याचिका आतापर्यंत 18 वेळा सुनावणीसाठी आली. ऑगस्टमध्ये झालेल्या सुनावणीवेळी याचिका अंतिम सुनावणीसाठी घेण्याचे ठरले होते. तसे आदेशही न्यायमूर्तींनी दिले होते पण आता नोव्हेंबर महिना संपत आला तरी याचिका सुनावणीस येत नसल्याने न्यायालयातील सूची तयार करणाऱया विभागाविरूद्ध तक्रार केल्याचे चोडणकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

अंगणवाडी सेविकांचे कोरोना काळात उल्लेखनीय कार्य

Omkar B

सांखळीचा नगराध्यक्ष आज ठरणार तीनजणांचे अर्ज दाखल

Omkar B

वायब्रंट मडगाव पॅनलच्या मिलाग्रीना गोमीस यांना विजयी करा

Amit Kulkarni

वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

Patil_p

मेर्सिस वाडे वास्कोत वृक्ष कोसळून घराची हानी

Patil_p

लॉकडाऊन वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव

Patil_p
error: Content is protected !!