तरुण भारत

सांगली : देशव्यापी संपात जिल्ह्यातील ३५ हजार

कर्मचारी सहभागी होणार
खासगीकरण व कंत्राटीकरण विरोधात 26 रोजी संप

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

सरकारी योजनांचे कंत्राटीकरण आणि खासगीकरणाच्या धोरणास तीव्र विरोध करण्यासाठी देशपातळीवरील दहा प्रमुख संघटनांनी 26 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. संपात देशातील 80 लाख, राज्यातील 17 लाख कर्मचारी सहभागी होतील. तसेच सांगली जिल्ह्यातील 35 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पुणे विभाग सचिव पी. एन. काळे, जिल्हाध्यक्ष जे. के. महाडिक आदींनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, श्रमिकांच्या कायद्यात हानीकारक बदल करून त्यांना देशोधडीला लावण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारी योजनांचे कंत्राटीकरण आणि खासगीकरण करून सेवा देण्याचा घाट घातला जात आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार झपाट्याने कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी नियुक्त करत आहे. त्यामुळे या धोरणाला तीव्र विरोध करण्यासाठी देशातील 10 प्रमुख संघटनांनी 26 रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्यातील 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होतील. सांगली जिल्ह्यातील देखील सरकारी, निमसरकारी असे 35 हजार कर्मचारी संपात सहभागी होतील. या दिवशी प्रत्येक कार्यालयासमोर सकाळी 11 ते 2 या वेळेत निदर्शने होतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साडे बारा वाजता निदर्शने केली जातील.

Related Stories

विट्याची ऐतिहासिक पालखी शर्यत यावर्षी रद्द

Abhijeet Shinde

कुपवाड एमआयडीसीत २० हजाराचा बेकायदा दारुसाठा जप्त: दोघांना अटक

Abhijeet Shinde

नवे सात रूग्ण वाढले, तर १३ जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

पूरग्रस्तांना भरीव मदत मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आमदार गाडगीळ

Abhijeet Shinde

शाळा सुरू झाल्या आणि शिराळा बस स्थानक गेले गजबजून

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत रेल्वेतून पडून अज्ञात तरुणाचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!