तरुण भारत

उपमुख्यमंत्र्यांची सरकारी पॉलिटेक्निकला भेट

विविध विषयांवर चर्चा करून महाविद्यालयाचे केले कौतुक

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयाला उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्री अश्वथनारायण यांनी भेट दिली. कोविड काळात प्राध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून जी प्रगती साधली त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले आहे.

शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. त्याबाबत त्यांनी प्राचार्य व प्राध्यापकांना विचारले असता इमारत बांधण्याबाबत आम्ही शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या इमारतीला काही ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे धोका निर्माण होवू शकतो. तेंव्हा तातडीने इमारत उभे करण्याबाबत हालचाली सुरू करा, असे अश्वथनारायण यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला. या महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला. त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. दरवर्षीच या महाविद्यालयाचा निकाल चांगला लागतो. त्यामुळे यापुढेही अशीच प्रगती साधा, असे अश्वथनारायण यांनी सांगितले. जो प्रस्ताव पाठविला आहे त्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती यावेळी करण्यात आली. तेंव्हा अश्वथ नारायण यांनी नक्कीच पाठपुरावा करून लवकरच निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन देखील दिले.

उपमुख्यमंत्र्यांच्याबरोबर आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, माजी आमदार संजय पाटील, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली, आयटीआयचे प्राचार्य वाय. एन. दोडमनी यांच्यासह महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. 

Related Stories

लोकमान्यतर्फे 11 लाखांचा भरघोस निधी

Patil_p

बेळगाव अग्निशमन दलातर्फे केएसआरपी जवानांना प्रशिक्षण

Omkar B

सदाशिवनगर येथे कोरोना रोगप्रतिकारक औषधांचे वितरण

Amit Kulkarni

शहापूर येथील माय-लेक दहा दिवसांपासून बेपत्ता

Amit Kulkarni

विश्रुत स्ट्रायकर्स, डीके लायन्स संघ विजयी

Amit Kulkarni

अवचारहट्टी (येळ्ळूर) येथे विठ्ठलाई मंदिराची स्लॅबभरणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!