तरुण भारत

ठळकवाडी हायस्कूलच्या नूतन प्रयोगशाळेचे उद्घाटन

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील एस. के. ई. सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलमध्ये शाळेच्या 1990 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या 1 लाख रुपये देणगीतून व प्रवर्तक मंडळाच्या सहकार्यातून निर्माण केलेल्या नूतन प्रयोगशाळेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रवर्तक मंडळाचे सदस्य एस. वाय. प्रभू, बिंबा नाडकर्णी, ऍड. आर. बी. देशपांडे, व्ही. एल. आजगावकर, शाळेचे माजी शिक्षक एम. आर. कुलकर्णी, जे. एस. खांडेकर, नरगुंदकर, सारंग, मुख्याध्यापक कुडतुरकर व दीपक शिंदे उपस्थित होते.

Advertisements

प्रारंभी एम. आर. कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर उपस्थित मान्यवरांचा व 1990 च्या विद्यार्थ्यांचा परिचय व स्वागत करण्यात आले. 1990 बॅचच्यावतीने दीपक शिंदे व अमित कुलकर्णी यांनी शाळेतील आठवणी जागृत करून गुरुजणांचे आभार मानले. शिक्षक सी. वाय. पाटील यांनी शाळेला मदत दिल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

प्राचार्य एस. वाय. प्रभू यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नवनवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण शाळेतील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन दिले. विज्ञान शिक्षक सुरेश भातकांडे यांनी नूतन प्रयोगशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषय योग्य प्रकारे शिकविण्यासाठी केला जाईल, याची ग्वाही दिली. सदर बॅचचे विद्यार्थी रविकिरण मोरे, गिरीष पाटील, प्रकाश चौगुले यांनी शाळेसाठी फॅन भेट दिला.

एस. जी. बाळेकुंद्री यांनी आभार मानले. सुरेश भातकांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

Related Stories

दोन दिवसांत 647 जण झाले कोरोनामुक्त

Patil_p

कर्नाटकचे कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी बेळगाव ईएसआय हॉस्पिटलची केली पाहणी

Rohan_P

बाळेपुंद्री खुर्द ग्रा.पं. अध्यक्षपदी रेणुका करवीनकोप्प

Amit Kulkarni

साईराज वॉरियर्स, विश्रृत स्ट्रायकर्सची विजयी सलामी

Patil_p

लॉकडाऊनच्या चर्चेमुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दी

Patil_p

निपाणी येथील दलित क्रांती सेनेचे निवेदन

Patil_p
error: Content is protected !!