तरुण भारत

घरबांधणी करताना हवी खबरदारी

विजेचा धक्का लागून अपघातांची संख्या वाढली

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

नवीन घराचे बांधकाम किंवा दुरुस्ती करताना योग्य खबरदारी न घेतल्याने विजेचा धक्का लागून अपघात होत आहेत. वीज वाहिन्या घरासमोरून गेल्या असतील तर काही अंतर सोडूनच घर बांधावे लागते. परंतु जागा वाचविण्याच्या नादात बऱयाच वेळा अपघात होत आहेत. बांधकाम करताना नजरचुकीने वाहिन्यांना स्पर्श होऊन असे अपघात होत आहेत. त्यामुळे घराचे बांधकाम करण्यापूर्वी नजीकच्या हेस्कॉम लाईनमनशी संपर्क साधण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी खानापूर तालुक्मयातील इटगीजवळ घराचे काम सुरू असताना शेजारून गेलेल्या विजेच्या वाहिन्यांना नकळत स्पर्श झाल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. असे काम करताना हात, बोटे इतर अवयव गमवावे लागले आहेत. अत्यंत कमी जागेत बांधकाम करताना जागा वाढवून घेण्यासाठी वीजवाहिन्यांजवळून बांधकाम करण्यात येते. काही वेळा वीजवाहिन्या काढण्याची मागणी नागरिकांकडून होते. परंतु एका ग्राहकासाठी वीजवाहिनीत बदल करणे शक्मय नसते.

घर किंवा इमारतीचे स्लॅब असतानाही बऱयाच वेळा हेस्कॉमशी संपर्क साधण्यात येत नाही. यावेळी कामगार किंवा साहित्याचा स्पर्श होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा वेळी हेस्कॉमशी संपर्क साधल्यास त्यांच्याकडून कोणती तरी उपाययोजना करून देण्यात येते. परंतु हेस्कॉमला कळविल्याशिवाय असे वीजपुरवठा बंद करण्याचा प्रकार करू नये, खांबावर चढून दुरुस्तीचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्ही. जी. नाईक (साहाय्यक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम ग्रामीण)

घराचे बांधकाम करताना योग्य खबरदारी न घेतल्याने शॉक लागून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत. असे अपघात टाळण्यासाठी विजेच्या वाहिन्यांपासून योग्य अंतरावर घर बांधणे गरजेचे आहे. घराचे स्लॅब किंवा इतर महत्त्वाचे काम असल्यास संबंधित लाईनमन किंवा सेक्शन ऑफिसरला माहिती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

आदित्य मिल्क शाखेचे उद्घाटन

Patil_p

इंडियन बॉईज, सीसीआय संघ विजयी

Amit Kulkarni

बांधकाम परवानगीचे अर्ज अडकले महसूल विभागात

Omkar B

दीनदयाळ यांचे विचार अनुकरणीय

Patil_p

चोर्ला गाव आठवडय़ापासून अंधारात

Amit Kulkarni

जिह्यात 17 कोरोना बाधित

Patil_p
error: Content is protected !!