तरुण भारत

मंगळवारी जिल्हय़ात 25 जण कोरोना बाधित

पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने काळजी घेणे गरजेचे

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना पूर्ण आटोक्मयात येईपर्यंत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना कमी झाला म्हणून कोणीही हलगर्जीपणा करु नका, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष होत असून सध्या हा आकडा वाढल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी आरोग्य विभागाने जिल्हय़ातील 25 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल दिला आहे. यामध्ये 15 रुग्ण बेळगाव तालुक्मयातील आहेत. शहरामध्ये 12 जण तर ग्रामीण भागातील तिघांचा यामध्ये समावेश आहे. मध्यंतरी केवळ दोन ते तीन रुग्ण आढळले होते. मात्र आता त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे. थंडीला सुरूवात झाली आहे. आता प्रत्येकाने काळजी घेणे महत्वाचे आहे.

देशामध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी लॉकडाऊनबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता बेळगाव जिल्हय़ातील जनतेही अधिक जागरुक राहून कोरोनाशी पुन्हा एकदा लढा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पहिल्या सारखेच प्रत्येकाने तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे.

मंगळवारी शहरातील रामतीर्थनगर, महावीरनगर-उद्यमबाग, सदाशिवनगर यासह बडाल अंकलगी, उचगाव, सांबरा, हिंडलगा या परिसरात रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आता सर्वजण बेफीकीर राहत आहेत. मात्र आता संख्या वाढत चालल्यामुळे दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. सध्या 300 जण सक्रिय रुग्ण आहेत. तेव्हा आता पुन्हा एकदा प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

खानापूर शहरासह ग्रामीण भागात रंगपंचमी उत्साहात

Amit Kulkarni

अरवाळी धरणाला दोन ठिकाणी गळती

Amit Kulkarni

दीपक नार्वेकर 16 वर्षाखालील बीपीसी क्रिकेट स्पर्धा आजपासून

Patil_p

जिल्हा लॉकडाऊनची गरज नाही

Patil_p

दोन महिन्यांनंतर दिवसभर शहर गजबजले

Amit Kulkarni

बियाणाच्या बाजरीने गाठली शंभरी

Patil_p
error: Content is protected !!