तरुण भारत

गरज मानसिक प्रथमोपचार संकल्पनेची

एकवीसावे शतक त्यातील समोर उभी ठाकलेली कोरोनासारखी अनेक आव्हाने, उद्भवणाऱया अनेक समस्या हे सारे पाहता आपण सर्वार्थाने सजग असणे गरजेचे आहे. शारीरिक, मानसिक आरोग्याचे प्रश्न सध्या ऐरणीवर आहेतच. मानसिक आरोग्याबाबत बोलायचे तर आत्महत्यांचे वाढते प्रमाण, डिप्रेशन, मानसिक आरोग्याशी निगडित असलेले अनेक प्रश्न, पर्यायाने धोक्मयात येणारे शारीरिक आरोग्य याचा वाढता आलेख चिंताजनक आहे. मानसिक आरोग्य निकोप राखायचे असेल तर त्यादृष्टीने आपण सर्वांनीच सजग असणे गरजेचे आहे. कोणताही प्रश्न एका रात्रीत उद्भवत नाही. जशी त्या गोष्टीची तीव्रता, वारंवारता, कालावधी वाढत जातो तसतशी ती समस्या उग्र रूप धारण करू लागते. गेल्या काही लेखांमध्ये आपण डिप्रेशन, त्याची विविध कारणे पाहिली. परंतु डिप्रेशनच्या उंबरठय़ावर असतानाच योग्य काळजी घेतली गेली तर भविष्यात उद्भवणाऱया अनेक समस्या, धोके टाळता येतात. ज्या पद्धतीने आपण भाजले, कापले तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी प्रथमोपचार घेतो तसेच नातेसंबंधाच्या माध्यमातून, भावनिक सजगता वाढविण्यासाठी प्रेरीत करून आपण शास्त्रीय पद्धतीने मानसिक प्रथमोपचार करू शकतो. समाजभान असलेल्या व्यक्तींनी यात सहभागी होणे गरजेचे आहे. कारण अतिशय गतिमान आणि तीव्र स्पर्धेच्या काळात दैनंदिन जीवन जगताना ताणतणावांना, संघर्षाला तोंड देताना अनेकांची ‘स्वास्थ्य’ या शब्दाशी फारकत होताना दिसते. एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही तर चिडचिड, संतापणे, सतत मूड जाणे या गोष्टी होऊ लागतात. या गोष्टींची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी जर वाढत गेला तर हळूहळू सारेच अवघड होऊ लागते. आपले मानसिक आरोग्य तपासण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारणे आवश्यक आहे.

1. आपण स्वतःशी स्वस्थ आहोत का?

Advertisements

2. इतरांना आपल्या सहवासात स्वस्थ वाटते का?

3. आपल्यातल्या उणीवांचा शोध घेऊन त्या दूर करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत का? याची उत्तरे नकारार्थी आल्यास काही गोष्टींकडे लक्ष देणे आणि त्यात बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. तसेच 1. आपले ध्येय वास्तववादी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.

2. एखादा छंद वा आवड जोपासणे.

3. हलका व्यायाम, प्राणायाम, आपल्या मनात येणारे विचार, भावना उत्सुकतेने न्याहाळणे, श्वासावर लक्ष केंद्रीत करत नैसर्गिक श्वसनासोबत होणारी छाती-पोटाची हालचाल जाणणे. हे दररोज न चुकता करायला हवे.

4. आपण व्यक्त होऊ शकतो असे मित्र-मैत्रिणी जोडायला हवेत. 5. होणारे बदल लक्षात घेऊन टाळाटाळ न करता योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक. 6. शरीरासारखे मनही आजारी पडू शकते याचा स्वीकार.  7. नकारात्मक भावनांची तीव्रता, वारंवारता, कालावधी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक आहेत.

प्रथमोपचार-

‘मानसिक प्रथमोपचार’ ही संकल्पना रुजवताना, आधार देताना भावनांची सजगता, हाताळणी ही कौशल्ये आपण स्वतः शिकणे आणि त्या व्यक्तीला ती आत्मसात करायला मदत करणे आवश्यक आहे. अशी मदत करायची असेल तर ‘न बोलता ऐकू येणारे कान’ तयार करणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या लेखांमध्ये लिहिल्याप्रमाणे काही लक्षणे दिसत आहेत, बदल जाणवत आहेत तर तिच्याशी, त्या व्यक्तीच्या नातेवाईकांसोबत चर्चा करून या भावनांची वारंवारता, तीव्रता, कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे. जागरुकतेने आपण त्याच्याशी संपर्क साधायला हवा. हे करत असताना कदाचित तुमचे मित्र मैत्रिणी, कुटुंबीय याच्याकडून ‘लष्कराच्या भाकऱया भाजतो’ असे सूर कानावर पडण्याची शक्मयता नाकारता येत नाही. परंतु आपण आपल्या ध्येयावर ठाम राहात त्या व्यक्तीसाठी काय करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे.

1.डिप्रेशनच्या रुग्णाला भावनिक आधाराची गरज असते. 2.उपदेश न करता ती व्यक्ती काय म्हणते आहे ते ऐकून घेणे. 3. त्या व्यक्तीच्या मनात मी आहे,  हा आश्वासक भाव निर्माण करणे आवश्यक आहे. 4. त्या व्यक्तीला होणारा त्रास लक्षात आल्यावर कुटुंबीयांना विश्वासात घेऊन त्यांच्या सोबत संवाद साधत त्या व्यक्तीला गरजेनुसार समुपदेशक वा मानसोपचार तज्ञाकडे जाण्यास राजी करणे. 5.फोनच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. समजा डिप्रेशनच्या उंबरठय़ावर एखादी व्यक्ती असेल. उदा. हल्ली जरा अस्वस्थ वाटत आहे, मन लागत नाही, मन विचारात भरकटते, सतत उदासी जाणवते, काहीवेळा अगदी नीरस वाटते असे जर कुणी आपल्याला सांगत असेल तर.. या आधीच्या लेखात दिलेल्या भावनिक पट्टीनुसार ती व्यक्ती नेमकी कुठे आहे हे पाहण्यासाठी आपण तिला मदत करू शकतो. त्या व्यक्तीच्या नातेवाईकांपर्यंत पोहचून ती व्यक्ती नेमकी कशी वागते आहे. तिच्या नजीकच्या संपर्कातील कुणाला काय बदल जाणवतात हेही जाणून घेऊ शकतो.

जसे की अलीकडेच ती/तो थोडा अलिप्त राहते/राहतोय.. काहीतरी बदलत आहे हे लक्षात येत आहे. थोडे उदास वाटते अशी सौम्य पद्धतीची लक्षणे असतील तर मन दुसरीकडे वळवणारे छंद जोपासणे, मनातील भावना, विचार याकडे लक्ष देत त्याच्यातून वेगळे करण्याचे कौशल्य शिकवणे यामधूनही ती व्यक्ती बाहेर येऊ शकते. s   समजा त्या व्यक्तीची चिडचिड होते आहे, झोप लागत नाही, निराशा वाटते आहे तर अशावेळी वरील गोष्टींसोबतच त्या व्यक्तीला समुपदेशकाकडे जाण्यासाठी प्रेरीत करणे गरजेचे आहे.

डिप्रेशनची बऱयापैकी लक्षणे आहेत तर समुपदेशन आणि मानसोपचार याची सांगड घालणे आवश्यक ठरते. मानसोपचार तज्ञांच्या मदतीने डिप्रेशनवरील उपचार आणि समुपदेशन यामुळे ती व्यक्ती रुळावरती येऊ शकते.

s  डिप्रेशन तीव्र स्वरुपातील असेल तर नातेवाईकांना सोबत घेत, समजावत तात्काळ मानसोपचार तज्ञाची मदत, व्यवस्थित उपचार घेणे, त्या उपचारांमध्ये मानसोपचार तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सातत्य ठेवणे, खंड न पडू देणे या गोष्टीही आवश्यक आहेत. त्यासाठी आपण त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहू शकतो.

आपण काय करू शकतो..

कनेक्ट-अशा व्यक्तीला मी सोबत आहे या भावनेने आश्वस्त करणे. काउन्ट-तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस ही भावना आपल्याला शक्मय असेल तर आपण नाहीतर त्याच्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्या व्यक्तीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. कॅपॅबिलिटी-तू सक्षम आहेस, हे तू नक्कीच करू शकशील ही भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण करणे. करेज-म्हणजेच ‘आताचे दिवसही निघून जातील’. तू नक्कीच या परिस्थितीतून पुढे प्रगतीच्या दिशेने जाशील हा उद्याचा आशेचा किरण निर्माण करणे. अशा पद्धतीने भावनांची सजगता वाढविण्याच्या दृष्टीने आपण सजगतेने समाजासाठी काम केले तर निश्चितच मनोविकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईलच आणि गरज असलेल्या व्यक्तीला योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळून सामाजिक आरोग्यही निकोप राहण्यास मदत होईल.

Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583

Related Stories

‘एमपीएससी’ कधी सुधारणार?

Patil_p

गाझापट्टीतील संघर्ष अखेर शस्त्रसंधीने शमला

Patil_p

सुसंस्कृत ‘असामी’

Patil_p

यदु आणि अवधूत भेट

Patil_p

दहावा गुरु समुद्र

Patil_p

कोरोनाच्या संकटाने दिलेले संकेत

Patil_p
error: Content is protected !!