तरुण भारत

कोल इंडिया सौर प्रकल्पांमध्ये 5,650 कोटी गुंतवणार

वृत्तसंस्था/ मुंबई

सरकारी क्षेत्रातील कंपनी कोल इंडिया येत्या चार वर्षांमध्ये सौर प्रकल्पांमध्ये 5,650 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक साधारणपणे मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. सदर गुंतवणुकीतून 14 सौर प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यामधून खाण कामासाठी वीज उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. 

कोल इंडिया जगातील सर्वात मोठी कोळसा खाण कंपनी आहे. कोल इंडियाच्या माहितीनुसार कंपनी 5,650 कोटी रुपयांतील जवळपास दोन तृतियांश रक्कम ही छतावर आणि जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी खर्च करणार आहे. सदर गुंतवणुकीच्या मदतीने 3 हजार मेगावॅट क्षमतेची वीज निर्मिती करण्याचे संकेत असून यातून सौर प्रकल्पाचा विस्तार करण्यावर कंपनी भर देणार आहे. यासाठी एनएलसी इंडिया लिमिटेड अर्थसहाय्य करणार आहे. या संयुक्त उपक्रमातून हा प्रकल्प विकसित करणार असल्याची माहिती आहे.

वीज खर्चात कपात

कंपनीने सध्या वीज खर्चावर नियंत्रण मिळवण्याचे ठरवलंय. सौर ऊर्जा प्रकल्पातून वर्षाला विजेच्या वापरासाठी होणारा खर्च कमी करणार आहे. सदर प्रकल्पातून वर्षाला एकूण जवळपास 4.4 टक्के खर्च होतो. कोल इंडियाने 2023-24 पर्यंत वर्षाला एक अब्ज टन कोळसा उत्पादन करण्याची योजना आखली आहे.

मागील 20 वर्षांमध्ये पहिल्यांदा कोल इंडियाचे उत्पादन 2019-20 मध्ये घसरण होत 6.3 दशलक्ष टनावर राहिले आहे. कोल इंडियाने एनटीपीसीसोबत हात मिळवणी केली आहे.

Related Stories

लवकरच मोबाईल, टीक्ही कपडय़ांची ऑनलाईन विक्री

Patil_p

पेमेंट कंपनी पेटीएमकडून गुगलवर आरोप

Patil_p

सलग दुसऱया दिवशी शेअर बाजार तेजीत

Patil_p

अंतिम दिवशी सेन्सेक्सची 433 अंकांची घसरण

Patil_p

लेनोवोचा 7 आय स्लिम लॅपटॉप दाखल

Patil_p

घरांची विक्री एप्रिल-जूनमध्ये 67 टक्क्मयांनी घटली

Patil_p
error: Content is protected !!