तरुण भारत

शेअरचॅट प्लॅटफॉर्मची गुगल करणार खरेदी

लॉकडाऊनसह चिनी ऍपवरील बंदीचा शेअरचॅटला लाभ : ग्राहक संख्या तेजीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी ‘गुगल’ बेंगळूर येथील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅटची खरेदी करण्याचे संकेत आहेत. हा व्यवहार जवळपास 7,600 कोटी रुपयांना (1.03 अब्ज डॉलर) होण्याची माहिती एका मीडियाच्या अहवालानुसार देण्यात आली आहे.

कोरोना काळामध्ये शेअरचॅटच्या मासिक सक्रीय ग्राहकांमध्ये 166 टक्क्यांची वाढ होत आहे. कंपनीचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भानू प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संकटात शेअरचॅटचे सक्रीय मासिक ग्राहक हे 60 दशलक्षने वाढून 160 दशलक्षच्या घरात पोहोचले आहेत. 

2020 मध्ये शेअरचॅटच्या सक्रीय ग्राहकांमध्ये वाढ होण्यास काही कारणे कारणीभूत आहेत. त्यापैकी चीनचे व्हिडीओ शेअरिंग ऍप टिकटॉकवरील बंदी आणि लॉकडाऊनच्या निर्णयाचा मोठा लाभ मिळाला आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन अंमलात आल्यानंतर लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सर्वाधिक वेळ घालवला आहे.

कॅरेट इंडियाच्या डाटानुसार भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर वाढून आता प्रतिदिन 280 मिनिटांवर पोहचला आहे. 

स्थापना 2015 मध्ये

अंकुश सचदेवा, भानु प्रताप सिंह आणि फरीद अहसान यांनी 2015 मध्ये शेअरचॅटची स्थापना केली आहे. अंकुश या कालावधीत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले आहेत. भानु प्रताप सीटीओ आणि फरीद सीओओ आहेत.

शेअरचॅटने उभारले 222.8 अब्ज डॉलर्स

पंचबेसवर उपलब्ध असणाऱया डाटानुसार शेअरचॅटने 8 राउंडच्या निधीमधून आतापर्यंत 222.8 अब्ज डॉलर्सची रक्कम जमा केली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या मागील डी आवृती राउंडमध्ये शेअरचॅटने 100 दशलक्ष डॉलर्स रक्कम जमा केली होती. 2021 पर्यंत शेअरचॅटचे मूल्यांकन 1 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचण्याचे संकेत व्यक्त होत आहेत.

Related Stories

सॅमसंगचा विंड फ्री एसी बाजारात

Patil_p

भारतात क्हॉट्सअप पे सादर होण्याचा मार्ग मोकळा

Patil_p

इंडिया सिमेंटस्मधील दमानी बंधुंची हिस्सेदारी वाढली

Patil_p

सुरुवातीची तेजी गमावत सेन्सेक्सची घसरण

Patil_p

औषध निर्यात 15 टक्के वाढली

Patil_p

सलग सहा दिवसांच्या तेजीला अखेर विराम !

Patil_p
error: Content is protected !!