तरुण भारत

देशाची स्मार्टफोन निर्यात 1.5 अब्ज डॉलर्सवर ?

टेकआर्कचा अहवाल सादर : अमेरिका,संयुक्त अरबसह रशियात निर्यात वाढण्याचे संकेत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत सध्या दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्येच चीनसोबत सुरु असलेल्या व्यापारी संबंधातील तणावामुळे भारत सध्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून विविध उत्पादने स्थानिक पातळीवर तयार करत असल्याचे पहावयास मिळत आहे. याचा एक भाग म्हणून देशातून अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, रशियासह अन्य काही देशांना स्मार्टफोन्सची निर्यात वाढल्याची माहिती आहे.

वरील नवनवीन घडामोडींचा प्रभाव म्हणून स्मार्टफोन निर्यात 2020 मध्ये जवळपास 11,113 कोटी रुपयांहून (1.5 अब्ज डॉलर) अधिकचा टप्पा गाठण्याचे संकेत संशोधन कंपनी टेकआर्क यांनी सादर केलेल्या ‘भारतीय मोबाईल फोन निर्यात बाजार स्कॅन’ या अहवालातून दिले आहेत.

देशातून निर्यात होणाऱया एकूण मोबाईल फोन्समध्ये स्मार्टफोनची हिस्सेदारी ही जवळपास 98 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज या अहवालातून दिला आहे. भारत संयुक्त अरब अमीरात आणि शेजारील देशांना काही प्रमाणात मोबाईल निर्यात करत असल्याचे टेकआर्कने म्हटले आहे.

सध्याची निर्यात क्षमता

सद्यस्थितीत भारतामधून तब्बल 24 देशांना मोबाईल फोन्स निर्यात केले जातात. यामध्ये काही देश तीच निर्यात पुढे नेत आहेत. उदा. संयुक्त अरब अमीरात हा देश पुढे अन्य बाजारात स्मार्टफोन पाठवत आहे. कवूसा यांच्या माहितीनुसार सरकारने उत्पादनावर आधारीत प्रोत्साहन (पीएलआय) योजनेची घोषणा केली आहे. भविष्यात जागतिक मोबाईल आणि सुट्टय़ाभागाची पुनर्निमिती करण्यात येणार असल्याचे समजते.

Related Stories

एमआय 10 आय आज होणार दाखल ?

Patil_p

वनप्लस-9 आवृत्ती 2021 मध्ये येणार

Patil_p

शाओमीचा स्वस्त स्मार्ट टीव्ही सादर

Patil_p

रियलमीचे कमी किंमतीचे फोन बाजारात

Patil_p

लाव्हाची स्मार्टफोन बाजारात दमदार एंट्री

Patil_p

रियलमीचे दोन स्मार्टफोन्स सादर

Patil_p
error: Content is protected !!