तरुण भारत

टाटा ग्रुपचा व्यवहार महिन्याअखेर पूर्ण होणार

नवी दिल्ली

 टाटा ग्रुप आणि भारतातील मोठी इ ग्रॉसरी क्षेत्रातील कंपनी बिगबास्केट यांच्यातील व्यवहार आता अंतिम टप्प्यावर आला असून महिन्याअखेर खरेदी करार पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा ग्रुपने बिगबास्केटमधील वाटा खरेदी करणार असल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे. बिगबास्केट या इ ग्रॉसरी पोर्टलवरून दररोज 3 लाख ग्राहक ऑर्डर करतात. कंपनीचा महसूल 5 हजार 200 कोटी रुपयांवर असून कंपनीला 920 कोटींचा तोटा झालेला आहे. यासोबत आता अलिबाबा या व्यवहारातून बाहेर पडणार असं दिसतंय. अलिबाबाचा 29 टक्के वाटादेखील टाटा ग्रुप खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येते.

Advertisements

Related Stories

हिंडाल्कोचा निव्वळ नफा घटला

Omkar B

एसबीआय लाईफचा तिमाही नफा 16 टक्क्मयांनी वधारला

Patil_p

थेट प्रत्यक्ष कर संकलन 9.45 लाख कोटीवर

Patil_p

ऑटो क्षेत्रासाठी पीएलआय योजना आणण्याची तयारी

Patil_p

नव्या वर्षी अनेक वस्तु महागणार

Patil_p

टोयोटा उत्पादनात करणार घट

Patil_p
error: Content is protected !!