तरुण भारत

कोरगावात 20 लाखाचा गांजा जप्त

पेडणे  (प्रतिनिधी )

माईण – कोरगाव येथे पेडणे पोलिसांनी  एका  घरावर धाड टाकून 20 लाख रुपये किंमतीचे अमलीपदार्थ जप्त करुन मुंबई येथील एकाला व कोरगाव येथील एक अशा दोन नागरिकांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. या छाप्यात गांजा व केनाबीस गांजाची  झाडे मिळून 19  लाख 68 हजार 600 रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे.

  पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  कोरगाव येथे एका घरात अमलीपदार्थ व्यवसाय तसेच गांजा लागवड केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार एक टिम तयार करुन सोमवारी 23 रोजी राञी उशिरा माईण कोरगाव येथील त्या घरावर धाड टाकली. या धाडीत 20 लाख रुपये किंमतीचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी लार्सन रिचर्ड (बांद्रा – मुंबई, वय 34) आणि रेने नील संतान डिसोझा (44 वर्षे, कोरगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

  पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृतेवाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रफुल गिरी, कॉन्स्टेबल  विनोद पेडणेकर, अनिश्कुमार पोके, रवी म्हाळोजी, विशाल नाईक, गजानन सावंत, रोहन वेळगेकर व किरण परब यांचा या पथकात समावेश होता.

पोषक वातावरण निर्मिती करुन लागवड

या घरात गांजा झाडे लागवड करण्यासाठी संशयितांनी घरातच पोषक वातावरण निर्मितीसाठी पंखे, टय़ूब लाईट तसेच इतर साहित्य जे गांजा लागवडीसाठी पोषक ठरते त्या वस्तूंचा वापर करुन ही लागवड केली होती.

पेडणे पोलीस स्थानकाचा निरीक्षक म्हणून जिवबा दळवी यांनी ताबा घेतल्यानंतर अमलीपदर्थ लागवड केलेल्या एकूण सहा जागांवर धाड घालून ड्रग्ज तसेच अमली प्रदार्थ जप्त केला.

Related Stories

पोलीस मुख्यालयात कोरोना, भाजप आमदारालाही बाधा

Patil_p

भाजपासमर्थकांच्या सहकार्याने रमाकांत बोरकर सांकवाळच्या सरपंचपदी

Patil_p

हरवळे देवस्थानात महाशिवरात्रोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

दुर्दम्य इच्छाशक्ती,आत्मविश्वास तसेच सकारात्मकता या त्रिसूत्रीवर विद्यार्थी आत्मनिर्भर

Amit Kulkarni

उत्तरप्रदेश सरकारने मुलांवर होणारी छळणूक थांबवावी गोवा महिला काँग्रेसची मागणी

GAURESH SATTARKAR

अखेर श्री शांतादुर्गा देवीच्या जागेत होणारा मलनिःस्सारण प्रकल्प रद्द करण्याची मंत्री मायकल लोबो यांची घोषणा

Amit Kulkarni
error: Content is protected !!