तरुण भारत

डी. के. शिवकुमार चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात हजर

अनावश्यक मालमत्ता प्रकरण

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे (केपीसीसी) अध्यक्ष डी. के. शिवकुमार बुधवारी दुपारी बेंगळूर येथील सीबीआय कार्यालयात ७४.९३ कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या प्रकरणात सीबीआय अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर झाले.

दरम्यान सीबीआय कार्यालयात पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी, मी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे, असे ते म्हणाले. तसेच शिवकुमार यांनी मी आयकर आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच सीबीआयलाही सहकार्यकरणार असल्याचे त्यांनी म्हंटले.

१९ नोव्हेंबर रोजी सीबीआय अधिकाऱ्यांनी डी.के. शिवकुमार यांना २३ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले होते, पण आपल्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये व्यस्त असल्याने त्यांनी एजन्सीला २५ नोव्हेंबरला हजर होण्याची परवानगी देण्याची विनंती केली.

५ ऑक्टोबर रोजी सीबीआय अधिकाऱ्यांनी शिवकुमारविरूद्ध डीए चा गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर सीबीआयने शिवकुमार यांच्या निवासस्थानावर तसेच कर्नाटक आणि दिल्ली येथील साथीदारांच्या इतर १३ ठिकाणी छापे टाकले होते.

Advertisements

Related Stories

खादी उत्पादनांना ऑनलाइन व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मिळणार

Abhijeet Shinde

रमेश जारकिहोळी यांनी अथणी येथे आरएसएस नेत्याची घेतली भेट

Abhijeet Shinde

राज्यात लॉकडाऊन की अनलॉक; मुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक

Abhijeet Shinde

कर्नाटकात शनिवारी १,२२९ नवीन रुग्ण, तर १३ मृत्यू

Abhijeet Shinde

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मेंढय़ा विक्रीला अल्प प्रतिसाद, मेंढपाळ चिंताग्रस्त

Rohan_P

बेंगळूर : पोलिसांकडून तीन गांजा विक्रेत्यांना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!