तरुण भारत

परराज्यातील प्रवाशांची तपासणी सुरू

वाहतूक टोलनाक्यावरून वळविली : स्थानिक वाहनांना तपासणीतून सूट

प्रतिनिधी / बांदा:

गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱया परराज्यातील वाहनचालक व
प्रवाशांची बांदा-सटमटवाडी येथे गोवा राज्याच्या सीमेवर थर्मल स्क्रिनिंगची कार्यवाही बुधवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकाऱयांनी आदेश दिले होते. तपासणीसाठी मुख्य महामार्ग सीमा तपासणी नाक्याजवळ बंद करत तो टोल नाक्यावरून वळविण्यात आला आहे. दोन पथके या ठिकाणी तपासणी करत आहेत. तसेच महसूल, पोलीस व वैद्यकीय विभागाचे कर्मचारी तैनात आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी करण्यात येत आहे. गोव्यातून येणाऱया स्थानिक वाहनांना सूट देण्यात येत आहे. थर्मल स्क्रिनिंगदरम्यान ताप वगैरे लक्षणे असलेल्या प्रवाशांची अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास नजीकच्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

गेल्या काही महिन्यापासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत होते. मात्र, दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यातून येणाऱया वाहनधारक,
प्रवासी यांची थर्मल गन स्क्रिनिंग करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने बुधवारपासून गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर सर्व ठिकाणी थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत आहे.

देडामार्ग सीमांवरही तपासणी

दोडामार्ग : दोडामार्ग-गोवा सीमेवरही बुधवारपासून तपासणीबाबतची कार्यवाही सुरू झाली आहे. येथील तहसीलदार कार्यालयानजीक असलेल्या सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर बुधवारी थर्मल गनद्वारे दोडामार्गात प्रवेश करणाऱयांची तपासणी सुरू झाली. तहसीलदार अरुण खानोलकर व प्रभारी पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांनी उपस्थित राहत या कार्यवाहीचा आढावा घेतला. आयी येथे गोवा सीमेवरदेखील अशीच कार्यवाही सुरू झाली आहे.

Related Stories

पतपेढी निवडणूक पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांचे शीतयुद्ध

Patil_p

जिल्हयातील आंबा, काजू शेतकऱयांना हवामान आधारित विम्याची प्रतीक्षा

Patil_p

तब्बल दीड लाखाने पर्यटक संख्या घटली

NIKHIL_N

डॉ. अफरोज अहमद सिंधुदुर्ग दौऱयावर

NIKHIL_N

नव्या जगबुडी पुलामुळे अडथळय़ांचे शुक्लकाष्ट थांबले!

Patil_p

बदलीनंतर पुष्पवृष्टी करून ‘पीआय’ कोळींना निरोप

NIKHIL_N
error: Content is protected !!