तरुण भारत

पंजाबमध्ये 785 नवे कोरोना रुग्ण; 31 जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये मागील 24 तासात 785 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 31 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 48 हजार 435 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, काल 444 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंतच्या एकूण 1,48,435 रुग्णांपैकी 1 लाख 36 हजार 622 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • 7,129 रुग्णांवर उपचार सुरु 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 30 लाख 75 हजार 865 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 7 हजार 129 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 137 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 13 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

गर्दी जमवल्याने ‘सपा’ला नोटीस

Patil_p

देशात 12,408 नवे बाधित, 120 मृत्यू

datta jadhav

खमींगर ग्लेशियरमध्ये 12 ट्रेकर्स अडकले; दोघांचा थंडीने मृत्यू

datta jadhav

आयुर्वेदिक औषधांनी कोरोनावर उपचार

Patil_p

कोरोनावरील आणखी एका औषधाला मंजुरी

datta jadhav

घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्याचा विरोधकांचा निर्णय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!