तरुण भारत

कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांसाठी ‘आरोग्य बंधू’ ऍप अनुकूल

आमदार अरविंद बेल्लद यांची माहिती

हुबळी : कोरोनाकाळात देशात हेल्थ इमर्जन्सी (आरोग्य आणिबाणी) उद्भवली आहे. परिणामी कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांना उपचार मिळविण्यासाठी अनेक संकटांचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा कठीण प्रसंगी ‘आरोग्य बंधू’ ऍप रुग्णांना आवश्यक उपचार मिळविण्यासाठी अनुकूल ठरणार आहे, अशी माहिती हुबळी-धारवाड पश्चिम मतदारसंघाचे आमदार अरविंद बेल्लद यांनी दिली. हुबळी येथील रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मंगळवारी आरोग्य बंधू ऍपचे अनावरण करून ते बोलत होते. कोरोनाची बाधा नसलेल्या अन्य रुग्णांना डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्यासाठी धडपड करावी लागते. शिवाय कोरोना परिस्थितीमुळे रुग्णांना पूर्वीप्रमाणे उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. अनावरण झालेल्या या डिजिटल ऍपमुळे रुग्णांना ऑनलाईनद्वारे डॉक्टरांची भेट घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच आवश्यक उपचारही घेता येणार आहे, असे ते म्हणाले. प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य बंधू ऍप वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. शिवाय ग्रामीण भागात आरोग्य बंधू केंद्रे सुरू करण्याचा विचार सुरू आहे. येथील वैद्यकीय कर्मचारी जनतेला ऍपचा वापर आणि डॉक्टरांशी कसा संपर्क साधावा, याबबात माहिती देणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Advertisements

Related Stories

शाळा सुरू होताच व्हायरल इन्फेक्शन विद्यार्थी त्रस्त, शिक्षक-पालक चिंतेत

Omkar B

सफाई कर्मचाऱयांचा सत्कार

Amit Kulkarni

प्राण्यांवर अंत्यक्रियेसाठी जागेची मागणी

Amit Kulkarni

कर्नाटक बिटकॉइन घोटाळा: भाजपने नेतृत्व बदलाची शक्यता फेटाळली

Sumit Tambekar

आरपीडीतर्फे हुतात्मा दिन गांभीर्याने

Patil_p

म.ए.समितीचे नेते वाय.बी.चौगुले यांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!