तरुण भारत

खरेदी करताना अधिक घेतलेला कर परत द्या

खरेदीदार-वकिलांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : सरकारकडून कोरोनामुळे 6 ऐवजी 2 टक्के कर आकारणीचा आदेश

प्रतिनिधी / बेळगाव

सरकारने 20 लाखांपर्यंत खरेदी केलेल्या फ्लॅटच्या करामध्ये कमी केली आहे. 6 टक्क्मयावरुन 2 टक्के शुल्क आकारण्यात येत आहे. याबाबत 19 नोव्हेंबर रोजी सरकारने अध्यादेश काढला होता. मात्र 20 नोव्हेंबर रोजी खरेदी झालेल्या फ्लॅटसाठी 6 टक्क्मयाप्रमाणेच शुल्क घेण्यात आले. त्याविरोधात खरेदीदार आणि वकिलांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन अधिक घेतलेली रक्कम परत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

फ्लॅट किंवा कोणतेही घर घेताना त्यासाठी 6 टक्के कर आकारला जातो. त्यामुळे मोठी रक्कम मोजावी लागत होती. कोरोना काळात ही रक्कम भरणे अशक्मय होत होते. त्यामुळे सरकारने 20 लाखांपर्यंत खरेदी करणाऱयांना 6 टक्के ऐवजी 2 टक्केच कर आकारण्याचा अध्यादेश काढण्यात आला. यामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे. त्याचे स्वागत देखील करण्यात आले. मात्र बेळगाव उपनोंदणी कार्यालयामध्ये अध्यादेश काढल्यानंतरही 6 टक्क्मयांप्रमाणेच कर घेतल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

लक्केश हेग्गण्णावर यांनी याबाबत खरेदी व्यवहार केला. ऍड. एन. आर. लातूर यांनी याबाबत सर्व कागदपत्रांची पुर्तता केली आणि खरेदी पूर्ण केली. मात्र 6 टक्क्मयांप्रमाणेच कर घेतल्यामुळे तो कर परत द्यावा, अशी मागणी उपनोंदणी अधिकाऱयांकडे केली.

मात्र तो कर सरकारकडे जमा झाला असून तुम्ही त्याबाबत रितसर मागणी केल्यानंतरच मिळेल, असे आश्वासन दिले. या व्यवहारामध्ये 66 हजार रुपये अधिक घेण्यात आले. ती सर्व रक्कम आम्हाला परत द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात
आली. अशाप्रकारे त्या दिवशी मोठय़ा प्रमाणात व्यवहार झाले असून त्या सर्वांकडून 6 टक्क्मयांप्रमाणेच कर आकारल्याचा संशय आहे. तेंव्हा त्याची चौकशी करावी आणि सर्वांची रक्कम परत करावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. एन. आर. लातूर, लक्केश हेग्गण्णावर, यशवंत लमाणी, जे. हिरेमठ, शितल बिलावर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Related Stories

टिळकवाडीत गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

Patil_p

इदलहोंड येथे गवतगंजीला आग

Patil_p

पुणे-बेंगळूर महामार्गाचा प्रवास धोकादायक

Patil_p

कुद्रेमनी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

जिल्हय़ातील पहिला रुग्ण झाला कोरोनामुक्त

Patil_p

संधीचे सोने करण्याचे कसब महिलांकडे!

Amit Kulkarni
error: Content is protected !!