तरुण भारत

गुरे वाहतूक करणाऱया दोघांवर रायपाटण पोलिसांची कारवाई

वार्ताहर / राजापूर

विनापरवाना गुरे वाहतूक करणाऱयांवर रायपाटण पोलिसांनी कारवाई करताना गुरे घेऊन जाणाऱया टेम्पोसह जयदीप अशोक वाघरे (गगनबावडा) व चांदमिया ठाकूर (रत्नागिरी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.   

Advertisements

या बाबत राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून अणुस्कूरामार्गे कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱया टेम्पोची (एम.एच.09-एल-8694) अणुस्कूरा चेकपोस्ट येथे तपासणी केली असता टेम्पोमध्ये 7 जनावरे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गुरे वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याने पोलिसांनी गुरांनी भरलेल्या टेम्पोसह जयदीप व चांदमिया या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांवर मोटरवाहन कायदा कलम 66/192, 68/140, भा.दं.वि.कलम 34, तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध 1960 चे कलम 11/1 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेली गुरे रायपाटण येथील नवजीवन विकास संस्थेच्या गोशाळेचे व्यवस्थापक महेश पळसुलेदेसाई यांच्याकडे पुढील कार्यवाही पूर्ण होईपर्यंत देखभालीसाठी ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल के. आर. तळेकर करत आहेत.

Related Stories

चिपळूण महापूरप्रश्नी केंद्र, राज्याने उत्तर देण्याचे निर्देश

Patil_p

कोकण कन्येच्या मदतीला धावून आला मास्टर ब्लास्टर!

Patil_p

साडी नेसून आले अन् मोबाईल घेऊन गेले

Patil_p

92 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात

Patil_p

रत्नागिरी (संगमेश्वर) : कळंबस्ते येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Abhijeet Shinde

परळ-दापोली एसटी बसला अपघात

Patil_p
error: Content is protected !!