तरुण भारत

रत्नागिरी : सागरी सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा राम भरोसे

रत्नागिरी / केतन पिलणकर :

26,11 हल्ल्या नंतर खडबडून झालेल्या राज्य शासनाने सागरी सुरक्षेला पाधान्य देत किनारपट्टी भागाची सुरक्षेतेसाठी सागरी सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्यात आली मात्र या सागरी सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसून येत आह़े ना कोणत्याही शासकीय सोयीसुविधा ना पुरेसे वेतन या शुल्ककाष्टामध्ये हे रक्षक अडकले आहेत़.


दहशतवादी कारवाईवर नजर ठेवण्यासाठी राज्याच्या किनारीपट्टी भागावर सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आल़ी यामध्ये रत्नागिरी जिह्याच्या किनारपट्टीवर 59 सुरक्षा रक्षक व 2 सुरक्षा पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आह़े या सुरक्षा रक्षकांचे वेतन हे शासनाच्या सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून देण्यात येत़े मात्र या सुरक्षा रक्षकांचे वेतन सहा-सहा महीने रखडत असून आवाज उठवल्यावरच काही महीन्यांचे वेतन देण्यात येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी तरुण भारतला सांगितल़े
जिह्यातील लँडींग पाईंटवर या सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येत़े बहुतांश पाईंट हे दुर्गेम असल्यामुळे मोबाईल ला नेटवर्प नसत़े त्यामुळे संशयास्पद घटना घटल्यास संपर्प साधाण्यासाठी सुरक्षा रक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत़े या सुरक्षा रक्षकांची आपले कर्तव्य बजावण्यासाठी सकाळ,दुपारा, रात्री अश्या सत्रामध्ये काम करावे लागत़े ऊन वारा व पावसाची तमा न बाळगता पहारा देण्यासाठी ना कोणतीही शेड, ना कोणतेही शस्त्राशिवाय जागता पहारा द्यावा लागत़ो त्यामुळे शासनाने सागरी सुरक्षेला गांर्भीयांने घेतले नसल्याचे स्पष्ट होत आह़े.


या सुरक्षा रक्षकांची भरती 2015-16 साली झाल़ी भरती झाल्यापासून या रक्षकांना जे तुटपूंजे वेतन आजतागयत जैसे थेच असून यामध्ये मागील काही वर्षामध्ये कोणतीही वाढ झाली नाह़ी तसेच कोणतीही शासकीय सोयीसुविधा व लाभ देखील मिळत नाह़ी सुरक्षा रक्षकांचे वेतन सहा-सहा महीने रखडत असल्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आह़े.


सुरक्षा रक्षकांचे वेतना संबंधी निधी हा मंत्रालयामधून येत असत़ो मात्र मागील काही वर्षामध्ये हा निधी विलंबाने येत असल्याचे सांगण्यात आल़े त्यामुळे सागरी सुरक्षेला शासनाकडून गांर्भीयाने घेत नसल्याचे स्पष्ट होत आह़े


सागरी सुरक्षेसह हे सुरक्षा रक्षक वीना परवाना मासेमारी व बंदरावर देखरेख देखील करत असतात़ यामुळे अवैद्यरीत्या मासेमारी करणाऱया नौकांवर नियंत्रण येत आह़े

Related Stories

बांद्यात माकडतापाबाबत आढावा

NIKHIL_N

कोरोनाने तयार मखरांची आरासच कोसळली

NIKHIL_N

कोव्हिड रूग्णालयातून मृतदेह नेला उचलून

Patil_p

मत्स्य दुष्काळाचे चित्र अधिक गडद!

Patil_p

जैतापूर प्रकल्प परिसरातील अडीच लाख रूपयांच्या साहित्याची चोरी

Patil_p

उत्तम गायक होण्यासाठी ध्यास हवा

Patil_p
error: Content is protected !!