तरुण भारत

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा हल्ला; 2 जवान शहीद

ऑनलाईन टीम / जम्मू :

श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराचा वेढा दिला आहे.

Advertisements

याबाबत माहिती देताना पोलीस महानिरिक्षक म्हणाले, हल्लेखोर मारुती कारमध्ये आले होते. त्यांनी अचानक जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे. शोधमोहिम सुरू असून लवकरच या विषयी अधिक माहिती मिळेल.

या हल्ल्यात आपले दोन जवान शहीद झाले आहे. जवानांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोन जवान गंभीररित्या जखमी झाले, त्यानंतर त्यांचे निधन झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण ही संघटना या भागात ॲक्टिव्ह आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले आहे. या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी पाकिस्तानी असून एक दहशतवादी स्थानिक असल्याचा अंदाज आहे.

Related Stories

बिहार : भाजप कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Rohan_P

तिहार तुरुंगात कैद्याची आत्महत्या

Patil_p

रॉयल एनफिल्डने मागवल्या क्लासिक बाईक्स

Patil_p

उत्तर भारतातील थंडीची लाट कायम

Patil_p

आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ला ठरणार अजामीनपात्र गुन्हा

prashant_c

तामिळनाडू निवडणुकीत झळकले प्रभाकरनचे पोस्टर

Patil_p
error: Content is protected !!