तरुण भारत

नवीन कांदळवनांमुळे बंधाऱयाच्या कामांत अडसर

कायमस्वरुपी पर्यायासाठी शिवसेना तालुका प्रमुखांची राज्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी / देवगड:

देवगड तालुक्मयातील खारभूमी किनारी बरीच गावे येत असून बऱयाच ठिकाणचे खारभूमी बंधारे हे वाहून गेल्याने शेतकरी सूपिक जमिनीमध्ये खाऱयापाण्याचा प्रभाव वाढल्याने शेतकरी बांधव शेती करण्यापासून वंचीत आहे. तालुक्मयातील सुमारे 40 ते 45 गावे खारभूमी लगत येतात. सुमारे 40 वर्षापूर्वी श्रमदानातून व शासकीय योजनातून बांधलेले बंधारे फुटल्याने त्याकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे त्या ठिकाणी नव्याने कांदळवन निर्माण झाले असून ते शेतकऱयांसाठी त्रासदायक ठरत आहे. नवीन बंधाऱयाचे बांधकाम करताना कांदळवनाचा प्रश्न निर्माण होत असून यावर अभ्यास समिती नेमून कायमस्वरुपी पर्याय काढण्यात यावा, अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

शेतकरी खारभूमी बंधाऱयाची पूर्नस्थापना होण्याबाबत खारभूमी विकास विभाग कार्यकारी अभियंत्याकडे वारंवार मागणी करीत असून बांधाची पूनःस्थापना करणेबाबत काही तांत्रीक अडचणी अधिकाऱयांना येत आहेत. पूर्वापार बांध शेतकऱयांनी अंग मेहतीने किंवा शासकीय योजनेअंतर्गत 35-40 वर्षापूर्वी बांधलेले असून बरेच बंधारे वाहून गेले. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या ठिकाणी नवीन कांदळवन निर्माण झाले. तसेच रिपीट एरिया व सीआर झेड परवानगीची अडचण निर्माण होत असल्याने खारभूमी विभागाचे बंधारे बांधणेबाबत मानसिकता असूनही या अडचणींमुळे कामे प्रस्तावित करणेस अडचण येत आहे. या कामांना राज्य शासनाच्या वनखात्याने परवानगी दिल्यास बऱयाच ठिकाणी बंधाऱयांची कामे केली जाऊ शकतात. कांदळवन निर्माण झाल्याने खारभूमी विभागामार्फत दुरुस्तीची कामे करायला घेतली असता काही पर्यावरण प्रेमी तक्रार करून कामात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अधिकारी वर्ग काम करण्यास धजावत नाहीत. आपल्या स्तरावर संबंधीत अधिकारी वर्गाकडून परिपूर्ण माहिती घेऊन या विषयावर मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून कायमस्वरुपी पर्याय काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

जिल्हय़ात कोविड काळात अर्भक मृत्यूदरात वाढ!

Patil_p

औषधसाठा प्रकरणी दोघांना मेमो

Patil_p

राजापूर भालावली येथील मंदिरात चोरी

triratna

चिपळुणातील सोळा गावांत ‘वणवा मुक्ती’साठी जनजागृती

Patil_p

कोकणातील संशोधक शेतकऱयाला केंद्र शासनाकडून स्वामित्व प्रमाणपत्र

Patil_p

मंडणगडात अडीच हजार नागरिकांना स्थलांतराचे आदेश

Patil_p
error: Content is protected !!