तरुण भारत

महाविकास आघाडीने ‘पिकेल ते विकेल’ ही योजना चोरली!

अतुल काळसेकर यांचा रत्नागिरीत आरोप : जागतिक मत्स्य दिनानिमित्त नीलक्रांती पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिनिधी / कणकवली:

महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील ‘वन डिस्ट्रिक्ट-वन प्रॉडक्ट,’ महिला व बचत गट गटशेती योजना, फळ उत्पादन योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी, व्हेंचर कॅपिटल अशा सहा योजना एकत्रित करून त्या योजनेला ‘पिकेल ते विकेल’ असे नाव दिले आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेतील या योजना असल्याने राज्य सरकारने किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख या योजनांमध्ये करणे आवश्यक होते. प्रधानमंत्री आत्मनिर्भर ही केंद्राची योजना चोरून ‘पिकेल ते विकेल’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेतील सर्व लाभ आत्मनिर्भर भारतमधूनच देण्यात येणार आहेत, असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी व गुहागरमध्ये त्यांनी लिहिलेल्या नीलक्रांती पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यावेळी काळसेकर बोलत होते. पुस्तिकेचे प्रकाशन जागतिक मत्स्यदिनाच्या निमित्ताने गुहागरमध्ये भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, राजीव किर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत, रामदास राणे, जिल्हा कोषाध्यक्ष आशिष जोगळेकर, धनगर आघाडीचे प्रदेश समन्वयक डॉ. मिलिंद जाडकर, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि सिंधु आत्मनिर्भर अभियानचे संयोजन अतुल काळसेकर यांनी नीलक्रांती नावाची पुस्तिका लिहिली आहे. या पुस्तिकेमध्ये मच्छीमार, शेतकरी यांच्यासाठी असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2020-25 ची संपूर्ण माहिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान सुरू केले असून या अंतर्गत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर केली आहे. त्याचा फायदा कोकणातील छोटय़ा मच्छीमारांनाही होणार आहे. त्यातून मच्छीमार सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांनी सांगितले.

20 हजार 50 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी भाजपने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही योजना भारतातील खारे, निमखारे व गोडय़ा पाण्यातील मत्स्य संवर्धन, त्यामुळे निर्माण होणारे रोजगार व सशक्त अर्थकारण यासाठी दिशादर्शक असल्याचे काळसेकर यांनी सांगितले.   

Related Stories

काजू बी फसवणूकप्रकरणी संशयिताला अटकपूर्व जामीन

NIKHIL_N

सांडेलावगण-कासारी येथे खाडीत दोघे जण बुडाले

Patil_p

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱया युवकावर गुन्हा

NIKHIL_N

केवायसी करण्याच्या बहाण्याने 69 हजाराचा गंडा

Patil_p

प्रवाळ क्षेत्रांसाठी ‘ब्लॅक टीप शार्क’ वरदानच!

NIKHIL_N

सादिल अनुदानाचे 28 कोटी गेले कुठे?

NIKHIL_N
error: Content is protected !!