तरुण भारत

परंपरेनुसार कार्तिकी एकादशी उत्साहात

शहर परिसरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

विठुनामाचा जयघोष करत शहर परिसरात परंपरेनुसार कार्तिकी एकादशी मोठय़ा उत्साहात कोरोनाच्या नियमांचे पालन करत साजरी करण्यात आली. सामूहिक कार्यक्रम आयोजित न करता विधीनुसार कार्तिकी एकादशीचा सोहळा पार पडला. यामुळे शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये लख्ख विद्युत रोषणाई, विठुनामाचा जप, पानाफुलांची सजावट व प्रसन्न भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. भक्तांनी  विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेत कार्तिकी एकादशीचे आचरण केले.

बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री सांप्रदायिक भजनी मंडळाचे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, महाद्वार रोड येथील श्री ज्ञानेश्वर माउली विठ्ठल रखुमाई मंदिर, खडेबाजार येथील विठ्ठल मंदिर तसेच नामदेव दैवकी संस्थेचे विठ्ठल मंदिर, शहापूर येथील विठ्ठल मंदिरांमधून कार्तिकी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काकड आरती, अभिषेक, पूजा, भजन, आरती प्रसाद अशा कार्यक्रमांतून कार्तिकीचा सोहळा पार पडला. मंदिर व्यवस्थापनातर्फे गर्दी टाळण्याच्या उद्देशाने ट्रस्टी व भजनी मंडळाच्या सहभागातून कार्तिकी एकादशीचे धार्मिक विधी पार पाडले.

बापट गल्ली येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात सकाळी काकड आरतीचा सोहळा पार पडला. यानंतर ऍड. अशोक पोतदार, ऍड एस. हिरेमठ तसेच संजय जाधव यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. यानंतर पूजा, आरती व भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंदिराचे सेक्रेटरी प्रभाकर कणबर्गी, खजिनदार पांडुरंग जाधव तसेच राजू पवार व भजनी मंडळ उपस्थित होते. खडेबाजारमधील विठ्ठल मंदिरात काकड आरतीनंतर मनोज तेनशे यांच्या हस्ते अभिषेक करून पूजा-अर्चा करण्यात आली.

वारी नाही मात्र सावळय़ा विठ्ठलाचे घेतले दर्शन

यंदा कोरोनामुळे पंढरपूरला जाणाऱया कार्तिकी वारीला ब्रेक लागला आहे. यामुळे वारकरी समाजाबरोबरच कार्तिकी वारीला आवर्जून उपस्थित राहणाऱया भक्तांना पंढरपूरला जाता आले नाही. मात्र, शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये हजेरी लावत सावळय़ा विठुरायाचे दर्शन घेण्यात आले. गर्दी टाळण्याच्या दृष्टिकोनातून दिवसभर मंदिरे खुली करण्यात आली होती. सॅनिटायझर्सचा वापर, मास्कची सक्ती या नियमांचे पालन करण्यात आले.

Related Stories

रिसालदार गल्लीत देवदेवतांचे फोटो रस्त्यावर

Patil_p

बाबरी मशीदप्रकरणी सत्याचा विजय

Patil_p

भाग्यनगर येथे झाडांची पुन्हा कत्तल

Patil_p

जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनाचा शानदार सोहळा साधेपणाने साजरा

Rohan_P

गुंजीत अवजड वाहनांची वाहतूक रोखली

Amit Kulkarni

नलिनी केंभावी यांची पंतप्रधान साहाय्यता निधीला 1 लाखाची मदत

Patil_p
error: Content is protected !!