तरुण भारत

डॉ.आंबेडकरांनी संविधनाद्वारे देशाला दिली देण

ता. पं. व्यवस्थापक चंद्रकांत चव्हाण यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ बेळगाव

भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देशातील संविधान लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला मान, सन्मान आणि जगण्याचे धाडस दिले. त्यांनी संविधान लिहून अनेक गरीब, दुर्बलांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी जे कार्य केले आहे ते न विसरण्याजोगे आणि देशात आदर्श निर्माण करणारे आहे, असे मत तालुका पंचायतीचे व्यवस्थापक चंद्रकांत चव्हाण यांनी व्यक्त केले.

तालुका पंचायत कार्यालयात कर्मचाऱयांच्यावतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी वरील विचार व्यक्त केले. प्रारंभी अकाऊंट अधिकारी शिल्पा वाली यांनी सर्वांना संविधान अबाधित राखण्यासाठी शपथ देवविली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

तालुका पंचायत अधिकारी श्रीधर सरदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक वैजनाथ सनदी यांनी केले. यावेळी बसवराज श्रीशैलमरद, शीतल पाटील, द्राक्षायणी कडीगौडर, एन. सी. अंगडी, बी. ए. शेख, सुजाता कांबळे, श्रीनिवास हकाटी, अर्पणा कित्तूरकर, एम. के. पुरोहित, शैला दोडमनी, माहेश्वरी आर., शिवलीला तारेकर, नेत्रावती रजपूत यांच्यासह तालुका पंचायतमधील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

शहरातील विविध ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. पण बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्यात आल्याने वाहनधारकांना अडथळा होत आहे. काही ठिकाणी वाहतुक कोंडीच्या समस्या उद्भवत आहेत. रस्त्यावर खडी-वाळू ठेवण्यात आल्याने वाहने स्लिप होत असल्याचे निदर्शनास आले असून, वाहन धारकांना धोकादायक बनले आहे. याबाबत महापालिकेच्या नगर योजना विभागाकडे तक्रार केली असता इमारत बांधकाम कर्त्यांना सूचना करण्यात येते. पण याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. वास्तविक पाहता अनधिकृत बांधकाम तसेच बांधकाम नियमावलीचे पालन होते की नाही यावर देखरेख करण्याची जबाबदारी सेक्शन अधिकारी आणि विभागिय अभियंत्यांची आहे. पण सदर जबाबदारी आपली नसून नगर योजना विभागातील अधिकाऱयांची असल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिका कार्यालयातील अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे अनधिकृत बांधकामाला पेव आला आहे. तसेच रस्त्यावर साहित्य टाकून अडथळा करण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱयांनी याबाबत आवश्यक कारवाई करून समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध

Omkar B

बेळगावला सलग तिसऱया दिवशीही दिलासा

Patil_p

बेळगावच्या दुसऱ्या रेल्वेगेटचा लोखंडी खांब कोसळला

Rohan_P

दर्शन युनायटेड फुटबॉल संघाचा गोवा दौरा यशस्वी

Patil_p

निपाणी परिसराला पावसाने झोडपले

Patil_p

राम मंदिराकरिता निधी संकलन अभियान 15 जानेवारीपासून

Patil_p
error: Content is protected !!