तरुण भारत

जिल्हय़ातील 32 जणांना कोरोनाची बाधा

एकाचा मृत्यू, तालुक्मयात 19 बाधित

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना बाधितांची संख्या आता वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साऱयांच्याच मनात धडकी भरत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्या उपाय योजना आहेत त्या करणे आता काळाची गरज बनली आहे. गुरूवारी बेळगाव जिह्यामध्ये एकूण 32 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर एका महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारी उपलब्ध होत आहे.

मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली होती. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे साऱयांनीच सुटकेचा निःश्वास सोडला असताना गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे आता खबरदारी घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र, गोवा राज्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे बेळगाव जिह्यातील जनतेलाही सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

बेळगाव जिह्यामध्ये गुरूवारी 32 जणांना कोरोना लागण झाली आहे. तर तालुक्मयामध्ये 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये शहर, उपनगरांतील 18 व ग्रामीण भागातील एकाचा समावेश आहे. सांबरा, सदाशिवनगर, वडगाव, शहापूर, हिंदवाडी, जाधवनगर, यमनापूर, भाग्यनगर, बसवाण गल्ली-बेळगाव, समर्थनगर, अजमनगर, टिळकवाडी या परिसरात रुग्ण आढळले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे सर्व विभाग खुले करण्यात आले होते. मात्र पुन्हा वाढ होत असल्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या 279 जण सक्रिय असून त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

Related Stories

गोकाक येथे बाप-लेकाला कोरोनाची लागण

Patil_p

कुमारस्वामी लेआऊटमध्ये कोविड केअर सेंटर

Patil_p

हमारा देश संघटनेतर्फे आज महाआरती

Patil_p

जोतिबा मंदिरात काळभैरव जन्मोत्सव

Patil_p

स्वातंत्र्य दिनः कर्नाटकच्या ४ पोलिसांना गृहमंत्री पदक

triratna

देवदर्शनांवर सध्या प्रतिबंध

tarunbharat
error: Content is protected !!