तरुण भारत

स्थानिक क्रिकेटमध्ये श्रीशांतचे पुनरागमन होणार

वृत्तसंस्था/ कोची

भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस.श्रीशांत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुन्हा खेळताना दिसणार असून केरळ क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या स्थानिक टी-20 स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. मॅचफिक्सिंग प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्याच्यावर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर तो प्रथमच खेळताना दिसणार आहे. 17 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याचे आढळल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली होती. या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये त्याच्या बंदीचा कालावधी समाप्त झाला. अलापुझ्झा येथे होणाऱया टी-20 स्पर्धेसाठी खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात श्रीशांतचाही समावेश आहे. केसीए टायगर्स संघातून तो खेळणार असून सचिन बेबी या संघाचा कर्णधार आहे, असेही केसीएच्या पदाधिकाऱयाने सांगितले. या स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी झाले असून केसीए रॉयल्स, केसीए टायगर्स, केसीए टस्कर्स, केसीए ईगल्स, केसीए पँथर्स, केसीए लायन्स अशी त्यांची नावे आहेत. या पहिल्या केसीए प्रेसिडेंट्स चषक टी-20 स्पर्धेसाठी संघनिवड करण्याकरिता एक निवड समिती स्थापन करण्यात आली होती.

Related Stories

मुंबई संघाचा सलग तिसरा पराभव

Patil_p

संजिता चानूवरील उत्तेजक सेवनाचे आरोप मागे

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघटी-20 मानांकनात तिसरा

Patil_p

न्यूझीलंडमध्ये पहिला टी-20 मालिकाविजय हेच लक्ष्य

Patil_p

दुसऱया कसोटीतून कर्णधार विल्रयम्सन बाहेर

Patil_p

अभिमन्यु ईश्वरनची अडीच लाखांची मदत

Patil_p
error: Content is protected !!