तरुण भारत

द.आफ्रिका-इंग्लंड पहिली टी-20 लढत आज

वृत्तसंस्था/ केपटाऊन

इंग्लंडचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर असून उभय संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला न्यूलँड्समध्ये शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या मालिकेसाठी इग्लंडचा सर्वोत्तम टी-20 संघाची निवड करण्यात आली पण हा संघ सर्वोत्तम असल्याच्या साशंकतेची कर्णधार मॉर्गनने कबुली दिली आहे.

2020 च्या क्रिकेट हंगामात पहिल्यांदाच इंग्लंडच्या निवड समितीने सर्वोत्तम संघ या मालिकेसाठी निवडला आहे. या संघामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीची बाजू भक्कम आहे. दरम्यान या मालिकेसाठी निवडलेला संघ समतोल असला तरी हाच संघ सर्वोत्तम असल्याची खात्री मी देवू शकत नाही, असे प्रतिपादन इंग्लंड संघाचा कर्णधार मॉर्गनने गुरूवारी पत्रकाराशी बोलताना दिली. या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघातील किमान सात ए आठ खेळाडू भक्कम आहेत. ही मालिका दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टय़ावर होत असल्याने इंग्लंडला विजयासाठी सर्वच विभागात सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. सांघिक कामगिरीची मालिका विजयासाठी जरूरी असल्याचे मॉर्गनने म्हटले आहे. इंग्लंड संघातील बेन स्टोक्स हा अष्टपैलू कामगिरीची भूमिका चोखपणे बजावेल. वेगवान गोलंदाज सॅम करन किंवा फिरकी गोलंदाज माईन अली यापैकी एकाला संधी द्यावी लागेल. पुढील वर्षीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसीची विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धा भारतात होत आहे. दरम्यान वातावरण आणि खेळपट्टय़ा यांची तुलना केल्यास दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खूपच फरक जाणवतो. आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा डोळय़ासमोर ठेवून या आगामी मालिकेत दोन फिरकी गोलंदाजांना संधी मिळू शकेल. तसेच बेन स्टोक्स आणि सॅम करन हे प्रमुख दोन अष्टपैलू खेळाडू असून त्यांची या मालिकेत दर्जेदार कामगिरी होईल, असा विश्वास कर्णधार मॉर्गनने व्यक्त केला आहे.

Related Stories

उत्तराखंड संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी वासिम जाफर

Patil_p

खेलरत्न पुरस्कारासाठी विनेश फोगटचा अर्ज

Patil_p

मँचेस्टर सिटीमध्ये डायसचा लवकरच समावेश

Patil_p

टोकियो ऑलिंपिक ऍथलिट्सना आयसोलेशनची गरज नाही

Patil_p

टाटा ओपनमध्ये भारताच्या रामकुमार रामनाथन, अर्जुन कढे यांचे आव्हान संपुष्टात

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी हॅरीस

Patil_p
error: Content is protected !!