तरुण भारत

टी-20 : न्यूझीलंड-विंडीज आज आमनेसामने

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

विंडीजचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱयावर आहे. दरम्यान कोरोना महामारी संकटामुळे क्रिकेट शौकिनांच्या उपस्थितीवर विपरित परिणाम झाला होता पण न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये खूपच सुधारणा होत असून येथील वातावरण पूर्ववत होत असल्याचे दिसून येते. दरम्यान उभय संघातील टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी ऑकलंडमध्ये होणार असून या सामन्यावेळी क्रिकेट शौकिनांच्या उपस्थितीचे विंडीजकडून स्वागत केले जाईल.

या दोन संघामध्ये टी-20 चे तीन सामने आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. काही क्रिकेटपटूंना गुरूवारी आयसोलेशनमधून मुक्त करण्यात आले. त्यामुळे संघावरील दडपण कमी होत आहे. संयुक्त अरब अमिरातमधील आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळल्यानंतर न्यूझीलंडमध्ये ते दाखल झाले. लागलीच त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. विंडीज आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 चे तीन सामने चार दिवसांच्या कालावधीत खेळविले जाणार असून त्यानंतर हॅमिल्टनमध्ये पहिली कसोटी 3 डिसेंबरपासून सुरू होईल. चार दिवसांच्या कालावधीत तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळविणे ही वेगळीच बाब असून संघ निवड करताना कसरत करावी लागते, असे मत न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी व्यक्त केले.

टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडच्या निवड समितीने नियमित कर्णधार केन विलीयमसन आणि वेगवान गोलंदाज बोल्ट यांना विश्रांती दिली आहे. या दोन्ही खेळाडूच्या आयसोलेशन कालावधीत गुरूवारी संपत आहे. दरम्यान या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी साऊदीकडे कर्णधारपद सोपविले असून तो या मालिकेतील तिसऱया सामन्यात उपलब्ध राहणार नाही. साऊदी न्यूझीलंडच्या कसोटी संघात दाखल होणार आहे. न्यूझीलंडच्या कसोटी संघात सँटनर आणि मिचेल यांचा समावेश करण्यात आला आहे.

Related Stories

सुमीत नागलला प्रमुख ड्रॉमध्ये थेट प्रवेश

Patil_p

हॉटेल रुमच्या ‘त्या’ वादात तथ्य नाही

Patil_p

भारतीय संघाचे चिनी टेटे प्रशिक्षक मायदेशी रवाना

Patil_p

आयएसएलचे चार खेळाडू कोरोनामुक्त

tarunbharat

बेळगावच्या रोनित मोरे, रोहन कदम यांची कर्नाटक टी-20 संघात निवड

Patil_p

जर्मनी-स्पेन फुटबॉल सामना सप्टेंबरात

Patil_p
error: Content is protected !!