तरुण भारत

भारतीय तिरंदाजी संघटनेला अखेर मान्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय तिरंदाजी संघटनेने गेली आठ वर्षे भारतीय तिरंदाजी संघटनेवर निलंबनाची कारवाई केली होती. आता तब्बल आठ वर्षांनंतर अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेला आंतरराष्ट्रीय तिरंदाजी संघटनेकडून पुन्हा अधिकृत मान्यता मिळाली आहे. सदर माहिती क्रीडा मंत्रालयाच्या प्रवक्त्याने गुरूवारी दिली.

आंतरराष्ट्रीय तिरंदाजी संघटनेतर्फे भारतीय तिरंदाजी संघटनेला देण्यात आलेली अधिकृत मान्यता एक वर्षांच्या कालावधीसाठी राहील. दरम्यान 18 जानेवारी रोजी भारतीय तिरंदाजी संघटनेच्या नव्या पदाधिकाऱयासाठी निवडणूक घेतली जाईल. प्रत्येक चार वर्षांनी निवडणूक घेण्याचा नियम असून आता जानेवारीतील अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेची ही निवडणूक 2020 ते 2024 अशा चार वर्षांच्या कालावधीसाठी राहील. क्रीडा मंत्रालयातर्फे निवडणुकीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अर्जुन मुंडा, सचिव प्रमोद चंदुरकर आणि खजिनदार राजेदसिंग तोम्मर यांनी दिली. अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेची नियमानुसार निवडणूक झाली नाही म्हणून 2012 च्या डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय तिरंदाजी संघटनेने भारतीय तिरंदाजी संघटनेची अधिकृत मान्यता रद्द केली होती.

Related Stories

शासनाच्या निर्णयाची बीसीसीआयकडून प्रतीक्षा

Patil_p

सात महिन्यानंतर मोहन बगानला मिळाला करंडक

Patil_p

साऊदम्पटनकडून वेस्ट ब्रॉमविच पराभूत

Patil_p

कार्लसन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Patil_p

लि निंग कराराबाबत फेरविचार

Patil_p

सॅलिव्हा वापरावर ऑस्ट्रेलियाकडून बंदी

Patil_p
error: Content is protected !!